ETV Bharat / state

Aamchya Pappani Ganpati Anla: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' गाण्याचा 'गीतकार' आहे वडापाव विक्रेता, वाचा त्याचा खडतर प्रवास... - साईराज केंद्रे

Aamchya Pappani Ganpati Anla : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यानं सध्या संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातलाय. या गाण्याचा गीतकार कोण आहे, हे गाणं कुणी गायलं, यासारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेऊ या. (Songwriter Manoj Ghorpade)

Aamchya Pappani Ganpati Anla
आमच्या पप्पांनी गणपती आणला" गाण्याचा 'गीतकार'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 5:27 PM IST

Updated : Sep 16, 2023, 10:42 PM IST

मनोज घोरपडे यांची प्रतिक्रिया

ठाणे Aamchya Pappani Ganpati Anla : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' हे गाणं राज्यात प्रचंड गाजतंय. या गाण्याचा गीतकार एक वडापाव विक्रता आहे. त्याची कथा आता समोर आलीय. विशेष म्हणजे या गीतकारानं वडे तळता तळता या गाण्याची धून पाच वर्षापूर्वी तयार केली होती. त्यानंतर त्याच्या मुलांनी गेल्यावर्षी हेच गाणे गायलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. परंतु, तेव्हा पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. मात्र, अचानक हेच गाणं बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे या चिमुकल्यानं आपल्या अंदाजात गायलं. तो व्हिडिओ सोशल मीडियामुळं घरोघरी पोहोचला. पण या गाण्याचे गीतकार आणि गायक मुलांची कथा कधीच समाजासमोर आली नव्हती. (Manoj Ghorpade vada pav seller)

वडे तळण्याचं काम : सध्या कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी मिळण्यासाठी समाज माध्यमांवर ती प्रकाशित होणं गरजेचं झालंय. हे या व्हिडिओमुळं पुन्हा एकदा समोर आलंय. अशातच सध्या गणपतीच्या मुहूर्तावर 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्याचा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. मनोज घोरपडे याने पाच वर्षांपूर्वी हे गाणं तयार केलं होतं. तो भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायतमधील चरणी पाडा येथे वडिलांच्या वडापावच्या गाडीवर वडे तळण्याचं काम करतो. त्याचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली व मुलगी शौर्य हे दोघं या गाण्याचे गायक आहेत.

गीत लेखनाचा छंद : मध्यमवर्गीय घोरपडे कुटुंबीय वडापावच्या गाडीवर व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असतानाच मनोजनं आपल्या गीत लेखनाचा छंद लहानपणापासूनच जोपासलाय. मागील पाच वर्षांपूर्वी त्याने हे गाणं लिहिलं होतं. त्यानंतर हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगलं वाटेल, म्हणून आपल्या दोन्ही मुलांकडूनच सराव करून घेतलं होतं. हे गाणं 2022 मध्ये गाऊन घेतलं. सुरुवातीला त्याच्या मुलाच्या याच गाण्याला दोन मिलियन व्ह्यूज मिळाले होते. परंतु काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे यानं आपल्या अंदाजात गाणं गाऊन त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर या गाण्याला तब्बल साडेसहा मिलियन व्ह्यू ज मिळाले. आपल्या गाण्यांना साईराज केंद्रेमुळं अधिक प्रसिद्धी मिळाली, याचा आनंद होत असल्याचं मनोजने सांगितलंय. (aamchya pappani ganpati anla Songwriter)

गाणं धुमाकूळ घालेल : साईराज केंद्रेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या गाण्याला पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे मनोजचा हुरूप नक्कीच वाढलाय. नवरात्रीत आपल्या चिमुकल्या शौर्याकडून त्यांनी 'गरबा नाचायला आली मम्मीच्या संगे' हे गाणं गाऊन घेतलंय. स्वतः कोणतीही गायन कला शिकली नसताना उडत्या चालीवरील गाणी आपल्या मुलांच्या आवाजात गीतबध्द करण्यात आनंद आहे, असं मनोज म्हणतोय. 'गणपती येणार आमच्या घराला, दहा दिवसांची मजा करायला' हे मुलगा मोहित उर्फ माऊली मुलगी शौर्या व भाचा हृदय बुरुड यांच्या आवाजात गाऊन घेतलंय. नवं गाणं या गणपतीच्या आधी प्रकाशित करणार आहे. ते गाणंसुध्दा पहिल्या गणपती गाण्यासारखचं सर्वांच्या आवडीचं होईल, धुमाकूळ घालेल असा विश्वास मनोज घोरपडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलाय.

हेही वाचा :

  1. Ramdas Phutane Tribute to ND Mahanor: स्वतंत्र शैली असलेला एक कवी, गीतकार आपल्यातून निघून गेला- रामदास फुटाणे
  2. Grammy 2023: ग्रॅमी पुरस्कारांची धमाल, वाचा संपूर्ण यादीत कुणी काय जिंकले
  3. Grammys awards 2023: बेयॉन्सेने जिंकला सर्वोत्कृष्ट R&B गाण्याचा पुरस्कार जिंकला, सर्वाधिक विजयांचा रचला विक्रम

Last Updated : Sep 16, 2023, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.