ETV Bharat / state

ठाण्यातील 'या' शाळेने बनवला 'शिल्ड मास्क'; डॉक्टर, सहकर्मचाऱ्यांना होणार नि:शुल्क वाटप - shield mask thane

शिल्ड मास्क संपूर्ण चेहऱ्याच्या संरक्षणासाठी उपयुक्त असून तो वापरल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाशी बोलताना त्याच्या थुंकीद्वारे विषाणूचा फैलाव होण्यास आळा बसतो. त्यामुळे उपचार करणारे डॉक्टर, इतर आरोग्य सेवक व पोलिसांना कोरोना विषाणूचा धोका निर्माण होणार नसल्याचा दावा सॅक्रेड हार्ट शाळेचे शिक्षक जाधव यांनी केला आहे.

corona thane
शिल्ड मास्क
author img

By

Published : Mar 28, 2020, 9:31 AM IST

Updated : Mar 28, 2020, 9:42 AM IST

ठाणे- कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना जगभरात अनेक डॉक्टरांना त्याची लागण होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी जे लोक काम करत आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी शिल्ड मास्क तयार करण्यात आला आहे. हे शिल्ड मास्क कल्याण तालुक्यातील 'सॅक्रेड हार्ट' या शाळेने तयार केले असून तो डॉक्टर आणि सहकर्मचाऱ्यांना नि:शुल्क देण्यात येणार आहेत, अशी माहिती शाळेचे शिक्षक भूषण जाधव यांनी दिली.

कोरोना विषाणूमुळे जगासह देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस आणि इतर यंत्रणा कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, हे काम करत असताना त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, त्यांचा सुरक्षेसाठी सॅक्रेड हार्ट शाळेने शिल्ड मास्कची निर्मिती केली आहे. शाळेत उपलब्ध असलेल्या ३डी प्रिंटर, लेसर क्राफ्टिंगच्या सहाय्याने व पृसा या अंतराष्ट्रीय ३डी प्रिंटरस्ट्रेस बनविणाऱ्या कंपनीच्या मार्गदशनखाली आंतराष्ट्रीय दर्जाचे शिल्ड मास्क शाळेकडून बनविण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे, शिल्ड मास्क संपूर्ण चेहऱ्याच्या संरक्षणासाठी उपयुक्त असून तो वापरल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाशी बोलताना त्याच्या थुंकीद्वारे विषाणूचा फैलाव होण्यास आळा बसतो. त्यामुळे, उपचार करणाऱ्या डॉक्टर, मेडिकल स्टाफ व पोलिसांना कोरोना विषाणूचा धोका निर्माण होणार नसल्याचा दावा शिक्षक जाधव यांनी केला आहे. तसेच शाळेमध्ये तयार होणारे सर्व मास्क डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस यांना नि:शुल्क देण्याचा प्रयत्न आमच्या शाळेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा- भिवंडी तालुक्यात दापोडे गावातील लाकडी पॅलेटच्या गोदामाला भीषण आग

Last Updated : Mar 28, 2020, 9:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.