ETV Bharat / state

Thane Crime: ठाण्यात पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या - वाद पुन्हा

Thane Crime: वर्तकनगरमधील दारूच्या गुत्यावरून आरोपी जगदीश नरहरी आणि फिर्यादी विलास पवार व त्याचे मावस भाऊ दिपक निरभवणे, प्रशांत निरभवणे यांच्यात वाद झाला होता. त्या शाब्दिक चकमकीचा राग मनात धरीत गुरुवारी रात्री हा वाद पुन्हा दारू पाण्यावरून उफाळून आला.

Thane Crime
Thane Crime
author img

By

Published : Dec 10, 2022, 10:06 AM IST

ठाणे: दारूच्या गुत्यावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दारूपिण्यावरून उफाळलेल्या वादात एका गटाने संगनमत करत निरभवणे आणि त्यांच्या दोन भावांवर जीवघेणा हल्ला केला आहे. यात झालेल्या हाणामारीत दिपक निरभवणे याचा चाकू भोकसल्याने मृत्यू झाला आहे. तर प्रशांत निरभवणे आणि विलास पवार जखमी झाले आहेत.

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या

प्रकृती ठीक असल्याची माहिती: दुसऱ्या गटातील आरोपी जगदीश नरहिरे हा देखील जखमी झाला आहे. तिन्ही जखमींना उपचारार्थ कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली आहे.

लोखंडी सळईने हल्ला: मिळालेल्या माहितीनुसार, वर्तकनगरमधील दारूच्या गुत्यावरून आरोपी जगदीश नरहरी आणि फिर्यादी विलास पवार व त्याचे मावस भाऊ दिपक निरभवणे, प्रशांत निरभवणे यांच्यात वाद झाला होता. त्या शाब्दिक चकमकीचा राग मनात धरीत गुरुवारी रात्री हा वाद पुन्हा दारू पाण्यावरून उफाळून आला. यात आरोपी जगदीश नरहिरे, वैभव जगताप, प्रदीप महीपाल चव्हाण उर्फ नेक्सा वाल्मीकी, राकेश हगरगी आणि अजय धोत्रे यांनी संगनमत करीत वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ नगर भीमनगर परिसरात राहणारे विलास पवार व त्याचे मावस भाऊ दिपक निरभवणे, प्रशांत निरभवणे दुर्गा मंदिराजवळ बोलत उभे असताना आरोपींची सुरा आणि लोखंडी सळईने हल्ला केला.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल: यात दीपक निरभवणे याच्यावर आरोपी जगदीश नरहरी याने सुऱ्याने हल्ला केला. यात दिपकचा मृत्यू झाला तर अन्य आरोपींनी सळईने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात मृतकाचा भाऊ प्रशांत निरभवणे आणि मावस भाऊ विलास पवार हे जखमी झाले. तर आरोपी जगदीश नरहरी हा देखील जखमी झाला. तीघाना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. तिघांची प्रकृती ठीक असल्याची माहिती वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली.

काही तासात सर्व आरोपी ताब्यात: वर्तकनगर पोलिस ठाण्यात 5 आरोपी जगदीश नरहिरे, वैभव जगताप, प्रदीप महीपाल चव्हाण उर्फ नेक्सा वाल्मीकी, राकेश हगरगी आणि अजय धोत्रे यांच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करून अवघ्या काही तासात सर्व आरोपी ताब्यात घेतले आहे. तर नरहरी हा रुग्णालयात दाखल असल्याने पोलिसांच्या ताब्यातच आहे. अन्य आरोपी यांनी गुन्हा केल्यानंतर नाशिकच्या दिशेने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक अभ्यासदवारे पळून जाणाऱ्या आरोपीना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वर्तकनगर पोलिस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.