मीरा भाईंदर (ठाणे) - मुसळधार पावसामुळे शहरातील मोठे नाले भरुन वाहू लागले असताना काशी मीरा परिसरातील मीरा गावठाण गावदेवी मंदिरा लागत असलेल्या नाल्यात एक व्यक्ती पडल्या त्याचा मृत्यू झाला. तसेच नाल्याजवळ असलेल्या वाहनांचे मोठ्याप्रमाणा नुकसान झाले आहे. पोलीस व अग्नीशमन दलाच्या जवानांची त्याचा मृतदेह नाल्यातून काढून शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेिन जोशी रुग्णालयात पाठवले आहे.
मीरा भाईंदर शहरात मंगळवारी (4 ऑगस्ट) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील मुख्य मार्ग तसेच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मिरारोडमधील प्लेजेंट पार्क, सिल्वर पार्क, विजय पार्क, शीतल नगर, शांती नगर, पूजा नगर, मुन्शी कंपाउंड, सिल्वर सरिता, साईबाबा नगर या ठिकाणी गुडघाभर पावसाचे पाणी साचले आहे. तर भाईंदर पूर्व भागात बीपी रोड, नवघर रोड, केबिन रोड व भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्ली, जे पी ठाकूरमार्ग उत्तन परिसरात देखील पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन घेऊन किंवा पायी चालणेही कठीण झाले आहे.
पालिकेचा शंभर टक्के नालेसफाईचा दावा ठरला खोटा
शहरातील अनेक ठिकाणी नाले भरुन वाहू लागले आहेत तर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. शंभर टक्के नालेसफाई झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत होते. मात्र, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे त्यांचा हे दावा खोटा ठरला आहे.
युवक काँग्रसचेकडून उलट्या कमळाचे चित्र वाहत्या पाण्यात
मीरा भाईंदर युवक काँग्रेसने ज्या परिसरात पाणी साचले आहे. त्याठिकाणी जाऊन सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त केला. तसेच उलट कमळ चिन्हांचे चित्र कागदावर काढून ते पाणीमध्ये सोडण्यात आले. सत्ताधारी भाजपच्या निष्काळजीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे युवक अध्यक्ष दीप काकडे यांनी दिली.