ETV Bharat / state

ऑईलच्या टँकरला भीषण आग, आगीत टँकर जळून खाक - ठाणे लेटेस्ट न्यूज

बॉम्बे ऑईल कंपनीच्या ऑईल टँकरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत टॅंकर जळून खाक झाला आहे, तसेच आगीत कंपनीचे देखील नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सांयकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या बॉम्बे ऑईल कंपनीत घडली.

ऑईलच्या टँकरला भीषण आग
ऑईलच्या टँकरला भीषण आग
author img

By

Published : Jan 4, 2021, 6:57 PM IST

ठाणे - बॉम्बे ऑईल कंपनीच्या ऑईल टँकरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत टॅंकर जळून खाक झाला आहे, तसेच आगीत कंपनीचे देखील नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सांयकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या बॉम्बे ऑईल कंपनीत घडली.

भिवंडी तालुक्यात आगीचे सत्र सुरूच असून, आज सायंकाळच्या सुमरास शेलार गावच्या हद्दीत असलेल्या बॉम्बे ऑईल कंपनीमध्ये उभ्या असलेल्या एका ऑईलच्या टँकरला अचानक आग लागली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र या आगीमध्ये हे टॅंकर जळून खाक झाले, तसेच कंपनीचा देखील काही भाग जळाला आहे.

तालुक्यात वर्षभरात १७४ आगीच्या घटना

तालुक्यामध्ये वांरवार आग लागल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे ज्वालामुखीचा तालुका अशी नवी ओळख भिवंडी तालुक्याला मिळाली आहे. शहरासह ग्रामीण परिसरात असलेल्या शेकडो गोदामांमध्ये बेकायदेशीरपणे रासायनिक द्रव्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात आहे. या बेकायदेशीर केमिकल साठ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र भिवंडी तहसील विभागाने या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या अनधिकृत गोदामांना वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. भिवंडीत रासायनिक द्रव्याचा साठा असलेल्या गोदामासह इतर ठिकानी मिळून गेल्या वर्षभरात 174 आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये पालिकेचे 3 लाख 88 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र तरी देखील या प्रकारांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

ऑईलच्या टँकरला भीषण आग

भिवंडी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या नादुरुस्त

भिवंडी पालिकेच्या अग्निशमन विभागात ७२ कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी ४९ फायरमन आहेत. तर १६ वाहन चालक, एक फायर अधिकारी एक लिडिंग फायर मन, तीन क्लार्क, दोन ऑपरेटर, तर एक शिपाई आहे. भिवंडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात 6 अग्निशमन गाड्यांचा समावेश आहे. मात्र त्यातील 4 गाड्या या नादुरुस्त असल्याने सर्व भार या दोन गाड्यांवरच पडत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर एक दिवस भोपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. गोदाम भागात वारंवार लागणाऱ्या आगीवर ताबडतोब नियंत्रण आणण्यासाठी नवीन फायरस्टेशन बनविण्याची मागणी शासनाच्या विचाराधीन आहे, परंतु ग्रामीण लोकप्रतिनिधी आणि राजकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागात अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.