ठाणे - गुंगीचे औषध जेवणात कालवून आदिवासी तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील खळबळजनक बाब म्हणजे हे कृत्य करणाऱ्या नराधमाने या तरुणीला बेशुद्ध करत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तीला दिली. तो तीला सतत चार महिने ब्लॅकमेल करून वारंवार बलात्कार करत होता. Tribal girl raped in Thane district याप्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधमासह याच्या दोन साथीदारावर अत्याचारासह बळजबरीने गर्भपाताचा गुन्हा दखल करून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मुख्य नराधम फरार झाला आहे. शमशाद अन्सारी असे मुख्य फरार आरोपीचे नाव आहे. तर सागर कदम आणि मुकेश दिनगर असे अटक केलेल्या त्याच्या साथीदारांचे नावं आहेत.
कट रचून अत्याचार पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नराधम शमशाद अन्सारी आणि पीडित आदिवासी तरुणी हे कुळगाव परिसरातील एकाच कारखान्यात कामाला होते. त्यामुळे ओळख असल्याने जेवणासाठी एकत्र बसत होते. A Girl Raped In Thane District Unconscious त्यातच चार महिन्यांपूर्वी नराधम शमशादची वाईट नजर पीडितेवर पडली. तेव्हापासून तिच्यावर अत्याचार करण्याचा कट रचून त्याने चार महिन्यांपूर्वी पीडित तरुणीच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितेवर त्याने तिच्यावर अत्याचार केले. त्यावेळी बलात्काराचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केले होते. त्यानंतर अत्याचार व्हिडिओ दाखूवन तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, नराधम पीडित तरुणीवर चार महिने अत्याचार करत होता.
गर्भपात करण्याचा प्रयत्न नराधम शमशादचे वारंवार अत्याचारामुळे पीडित तरुणी गर्भवती राहील आहे. पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने नराधम शमशादचे साथीदार सागर कदम आणि मुकेश दिनगर यांनी तिचा एका रुग्णालयात येऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गभर्पातच्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घाटनास्थळी धाव घेऊन पीडितेचा गर्भपात करण्याऱ्या सागर आणि मुकेश यांना ताब्यात घेतले.
दोघांना पोलीस कोठडी - पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीवर बलात्कार, गर्भपात आणि दोघांवर गर्भपात करण्याचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, मुख्य आरोपी शमशाद अद्यापही फरार आहे. तर गर्भपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - जय राऊत यांचे मित्रही आता रडारवर, लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांवर गुन्हा