ठाणे - भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे व रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच एक महिलांची सक्रिय टोळी रात्रीच्या सुमारास चक्क गटारावरील लोखंडी झाकण लंपास करीत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शहरातील तांडेल वस्तीत हा प्रकार घडला आहे.
महिला चोरांची एक अशी टोळी जी तुमच्या घरात चोरी करत नाही किंवा दुकानात अथवा तुमचे मोबाईल किंवा चेन स्नॅचिंग देखील करत नाही. मग आपल्याला विचार पडला असेल का हे चोर नक्की चोरी करतात तरी काय ? तर हे महिला चोर तुमच्या घरासमोर असलेल्या गटारवरील लोखंडी झाकण लंपास करीत आहेत. भिवंडी शहरातील तांडेल मोहल्ला परिसरात लोखंडी झाकण चोरी करण्यासाठी रिक्षाचा वापरत करीत आहेत. ज्या परिसरात गटारावरील लोखंडी झाकण चोरी करायचे आहे. त्या ठिकाणी दाखल होऊन टोळीतील महिला लोखंडी झाकण पटापट काढून ते झाकण रिक्षामध्ये टाकून घटनास्थळावरून पसार होतात. या संपूर्ण घटनेचा प्रकार परिसरात लावण्यात आलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने लोखंडी झाकण चोरीची घटना उघडकीस आली आहे.
हे ही वाचा -दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द, जिल्हा प्रशासनाचा निर्णय
पोलीस व पालिका प्रशासनाला खबरच नाही -
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील गटारी वरील लोखंडी झाकण कसे गायब होतात व कसे चोरी होतात हे या घटनेतून स्पष्ट होतो. मात्र या संदर्भात पालिका व पोलिस प्रशासनाला अजूनही खबर नाही. परंतु आता समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आता तरी या झाकण चोर महिला टोळीवर कारवाही होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा - VIDEO : कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी, राज्य सरकार गप्प का? - संजय राऊत