ETV Bharat / state

Cruel Beating Of Minor Students : दोन अल्पवयीन विद्यार्थांना अमानुष मारहाण! शिक्षिकेवर गुन्हा दाखल - विद्यार्थांना अमानुष मारहाण प्रकरणी गुन्हा

मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थाला मौलवी शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, केवळ पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षिकेने ही मारहाण केल्याचे समोर आले आहे. दोन विद्यार्थांना प्रश्नाचे उत्तर देता आली नाहीत म्हणून अंगावर वळ येईपर्यंत मारहाण केली आहे. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपा अगरवाल असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

Cruel Beating Of Minor Students
निजामपूरा पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 7, 2023, 5:39 PM IST

ठाणे : पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार तक्रारदार कृणाल अरविंद पटेल (वय ३९) हे कुटूंबासह भिवंडी शहरातील कासार आळीमधील आनंद नगर भागात राहतात. तर, आरोपी शिक्षिका दीपा हिचे गोकुळनगर भागातील नालंदा इमारतीत घरातच खाजगी शिकवणीचा वर्ग आहे. या वर्गात तक्रारदार पटेल यांचे दोन मुलं शिक्षण घेत आहेत. त्यातच (दि. ३ मार्च)रोजी सायंकाळच्या सुमारास दोन्ही मुलं शिकवणीसाठी गेले होते. त्यावेळी शिक्षिका दीपा हिने विचारलेले प्रश्नाची उत्तरे दोन्ही मुलं देऊ शकली नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलांना शिकवणी वर्गातच अमानुषपणे मारहाण करत यांच्या अंगावर वळ येईपर्यत मारहाण केली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : या घटनेनंतर दोन्ही मुलं घरी गेल्यानंतर त्यांच्या अंगावर मारहाणीमुळे काळे निळे लाल चट्टे पडल्याचे आईला दिसले. त्यांनी तातडीने दोघांवर औषध उपचार केले. मात्र, दोन्ही मुलं दीपाच्या मारहाणीमुळे एवढे भयभीत झाले होते की, पुन्हा तिच्या शिकवणी वर्गात जाण्यास भीत होते. दरम्यान, इमारतीमधील एका रहिवाशांनी मुलांसोबत घडलेल्या अमानुष मारहाणीचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर (दि. ४ मार्च)रोजी मुलांचे पालक कृणाल पटेल यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निजामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार : काही दिवसापूर्वींच एका अल्पवयीन विद्यार्थाला ७० सेकंदात ७० काठीचे फटके मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसत असल्याने याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फहाद भगत नुरी (वय ३२, रा, भरूच , गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या मौलवी शिक्षकाचे नाव आहे. १४ वर्षीय पीडित विद्यार्थी हा भिवंडी शहरातील मिल्लत नगर भागात असलेल्या दारुल उलूम हसनैन करीमॅन 'दिनी मदारशात शिक्षण घेत आहे.

अमानुषपणे काठीने बेदम मारहाण : या मदरशात १२ वर्षापासून आरोपी फाहद हा या ठिकाणी शिक्षक आहे. त्यातच (दि. २४ नोव्हेंबर २०२२)रोजी नेहमीप्रमाणे मदारशात सकाळच्या सुमारास पीडित विद्यार्थी गेला होता. त्यावेळी आरोपी मौलवी शिक्षकाने त्याला पाठांतर करण्यासाठी सांगितले होते. मात्र, पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षकाने त्याला अमानुषपणे काठीने बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर जखमा केल्या. मात्र, हा धक्कादायक बेदम मारहाणीचा प्रकार त्यावेळी लपविण्यात आला होता.

विद्यार्थांना मारहाण केल्याची दुसरी घटना : या बेदम मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर म्हणजे (दि. २६ फ्रेब्रुवारी २०२३)रोजी मिल्लत नगर मधील दर्गा ट्रस्टी नूरअली हसन अली सय्यद ( वय ६३) यांच्या तक्रारीवरून मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकंदरीतच भिवंडी शहरात विद्यार्थांना मारहाण केल्याची दुसरी घटना समोर आल्याने पालकवर्गात मुलांच्या विषयी सतर्क रहाण्याची गरज असल्याची नागरिक करताना दिसत आहेत.

हेही वाचा : Children Got Food Poisoning: विक्टोरिया मेमोरियल अंधशाळेतील सात मुलांना अन्नामधून विषबाधा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.