ठाणे - शास्त्रीनगर परिसरातील नाल्यात अडकून पडलेल्या वासराची अग्निशमन दल, ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने सुखरूप सुटका केली.
तीन वर्षाचे हे वासरू साभा शंकर यादव यांच्या मालकीचे आहे. ते भटकत जाऊन चुकून नाल्यात अडकून पडले होते. याबाबतची माहिती मिळताच बुधवारी दुपारी कोंडवाड्याच्या कर्मचाऱ्यांनी तसेच, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाने त्वरित धाव घेऊन नाल्यातील वासराची सुटका केली. नाल्यात अडकल्याने भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या वासराला त्याच्या मूळ मालक साभा यादव यांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा - भिवंडीत पत्रकाराच्या चारचाकी वाहनाची तोडफोड; कुटुंबात भीतीचे वातावरण
हेही वाचा - वर पित्याची अशीही संकल्पना; 'वही'लाच बनवली लग्नपत्रिका