ठाणे - दारूच्या नशेत मद्यपही कोणाला काय करेल याचा नेम नाही. अश्याच एका मद्यपीने किरकोळ कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केले आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेतील बारकूपाडा भागातील मातृछाया हॉटेलबाहेर घडली असून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडतानाची घटना सीसीटीव्ही कैद झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर मद्यपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सागर अजित ठाकूर (वय 30 वर्षे, रा. अंबरनाथ पूर्व), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विशम अशोकलाल वाधवानी (वय 28 वर्षे,रा. शिवाजीनगर, अंबरनाथ), असे जखमी तरुणाचे नाव आहे.
जेवणाचा डवा घेण्यासाठी गेला असता डोक्यात फोडली बाटली
जखमी विशम हा अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात आलेल्या एका इमारतीमध्ये राहतो. दोन दिवसापूर्वी विशम हा मित्र नजीम पठाणसोबत अंबरनाथ पूर्वेतील बारकूपाडा भागातील मातृछाया हॉटेलजवळ गेला होता. त्यावेळी तो मोबाईलवर आपल्या मैत्रिणीशी बोलत असताना अचानक पाठीमागून सागरने त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपी सागर ठाकूर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याला आज (दि. 29) न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - शाब्बास रे पठ्ठ्या..! आदिवासी तरुणाला गुळवेल पुरविण्याचे १.५ कोटींचे मिळाले कंत्राट