ETV Bharat / state

मोबाईल अन् स्पीकरसाठी गच्चीवरुन ढकलून केला मित्राचा खून, आरोपी अटकेत - गच्चीवरुन ढकलून केला मित्राचा खून

मनोरुग्ण असलेल्या मित्राचा मोाबईल व स्पीकर चोरून इमारतीच्या गच्चीवरुन ढकलून देत मित्रानेच खून केला आहे. याबाबत पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी अटकेत आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Nov 6, 2021, 6:49 PM IST

नवी मुंबई - मनोरुग्ण असलेल्या मित्राचा मोाबईल व स्पीकर चोरून इमारतीच्या गच्चीवरुन ढकलून देत मित्रानेच खून केला आहे. ही घटना पवनेलमध्ये घडली असून या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

घटनास्थळ

कोणाला कळू नये म्हणून केला खून

प्रथमेश रमेश राणे (वय 19 वर्षे), असे मृत तरुणाचे नाव असून आदित्य शेकोटे (वय 18 वर्षे), असे खून केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पनवेल येथील साईनगर भागात हरभजन सिंग नावाची एक बंद अवस्थेत असलेली इमारत आहे. त्या इमारतीच्या गच्चीवर आदित्यने प्रथमेशला नेले. त्यानंतर त्याचा मोबाईल व स्पीकर चोरला याबाबत प्रथमेशने कोणाला सांगू नये या उद्देशाने आदित्यने प्रथमेशला इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिले.

असा झाला उलगडा

या बंद इमारतीच्या समोर असलेल्या इमारतीत गणेश म्हात्रे नावाची व्यक्ती राहते. गणेश हे त्यांच्या मित्रांशी फोनवर बोलत होते. तेव्हा त्यांना एक व्यक्ती या इमारतीवरून पडताना दिसला त्यानंतर तिथून एक व्यक्ती टॉर्च घेऊन पायऱ्या उतरताना दिसला. ही घटना त्यांनी मोबाईलवर चित्रीत केली. त्यानंतर मित्रांना व पनवेल पोलिसांना हा घटनेचा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आदित्यच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे ही वाचा - ठाण्यात अग्निकांड, घर कोसळून महिलेचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.