ETV Bharat / state

PFI: भिवंडीत पीएफआय संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ एका बांगलादेशी तरुणालाही अटक - मोहसीन हा बांगलादेशी तरुण

बांगलादेशातून छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणाला भिवंडी शहर पोलिसांनी शहरातील ताडाली परिसरात सापळा रचून त्याला अटक केली आहे. मोहसीन बादशाह मिया कोबीर (३०) असे गजाआड करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणाचे नाव आहे.

भिवंडी शहर पोलीस ठाणे
भिवंडी शहर पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 4, 2022, 8:38 PM IST

ठाणे - खळबळजनक बाब म्हणजे नवरात्री व दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर पोलीस यंत्रणा सर्तक होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत आहे. गेल्याच आठवड्यात देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थ साहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना भिवंडी शहरातून ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. मोहसीन हा बांगलादेशी तरुण शहरातील ताडाली बेकायद रहिवास करत असल्याची खबर भिवंडी शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा टाकून या बांगलादेशी तरुणास अटक केली आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - पोलीस सूत्राने सांगितले कि, हा बांगलादेशी तरुण गेली ८ वर्षांपासून भिवंडीत वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मध्यंतरी तो गावी जाऊन २ दिवसांपूर्वी भिवंडीत आला असता त्याला पोलिसांनी ताडाली भागातून सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून कोलकत्ता येथे आला. तसाच पुढे रेल्वेने कल्याणहून भिवंडीत येवून अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याची प्रथम दर्शनी तपासात आढळून आले आहे. या अटक बांगलादेशी तरुणाला आज न्यायायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत भिवंडीतून दोघांना अटक - दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणारी वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) संबंधित ठिकाणांवर राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) आज पुन्हा छापे (NIA Raid) टाकले. दिल्ली, उत्तर प्रदेशसह आठ राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. ‘पीएफआय’चे १००हून अधिक सदस्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत भिवंडी येथील एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. सोमवारी रात्री आशिक शेख याला अटक करण्यात आली. आतापर्यंत भिवंडीतून दोघांना अटक करण्यात आली (PFI Officer Arrested) आहे. याआधी 22 सप्टेंबर रोजी बंगालपूरा परिसरातून मोईनुद्दीन मोमीन याला अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.