ETV Bharat / state

बदलापुरात कोरोनाचे नव्याने ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ - बदलापुरात कोरोनाचे नव्याने ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ

कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीत चार दिवसांपूर्वी कोरोना बाधित तीन रुग्ण आढळले होते. त्या तीनही पॉझिटिव रुग्णाच्या नातेवाईकांना नगर परिषद प्रशासनाने त्याच दिवशी क्वारंटाईन केंद्रात दाखल केलं होते. दाखल असलेल्या त्या आठही जणांचा गुरुवारी सांयकाळच्या सुमारास कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी दिली आहे.

8 corona positive patients in Badalapur, Thane
बदलापुरात कोरोनाचे नव्याने ८ पॉझिटिव्ह रुग्ण
author img

By

Published : Apr 16, 2020, 11:51 PM IST

ठाणे : कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीत चार दिवसांपूर्वी पूर्व आणि पश्चिमेकडील परिसरात कोरोना बाधित तीन रुग्ण आढळले होते. त्या तीनही पॉझिटिव रुग्णाच्या नातेवाईकांना नगर परिषद प्रशासनाने त्याच दिवशी क्वारंटाईन केंद्रात दाखल केलं होते. दाखल असलेल्या त्या आठही जणांचा गुरुवारी सांयकाळच्या सुमारास कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी दिली आहे.

चार दिवसांपूर्वी बदलापुरात कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळून आले होते. त्यावेळीच बदलापूर नगरपरिषदेने पूर्व व पश्चिमेकडील या रुग्णांना कंटेनमेंट केला होता. तर या रुग्णांचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आपापसातील नातेवाईकांना कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं होतं. त्यामुळे हे नागरिक अजून कोणाच्या संपर्कात आले नसल्याने मोठा धोका टळला आहे. असे असले तरी हे रुग्ण यापूर्वी ज्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेण्यास आता कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांनी सुरुवात केली आहे.

बदलापूर नगरपालिका आणि पोलिसांकडून वारंवार आव्हान करूनदेखील आणि बदलापुरात कोरोनाचे तीन पॉझिटिव पेशंट आढळून देखील नागरिक हे लॉकडाऊन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात सर्वत्र भाजी विक्रेत्यांना परवानगी दिल्यानेदेखील नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरताना आढळत आहेत. त्यामुळे आता कोरोना रूग्णांची संख्या आठवरून अकरा वर गेली असल्याने तरी बदलापूरकर या बाबत गांभीर्य दाखवणार का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनात ताळमेळ नाही

कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या आठ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत माहिती ही अनेक पत्रकारांना मुंबईवरून समजली. मात्र, स्थानिक पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मात्र याबाबत अधिकृत माहिती नव्हती. तसेच अनेक अधिकारी आणि मुख्याधिकारी यांचे फोन बंद असल्याने प्रशासनानात ताळमेळ आणि गांभीर्य नसल्याचे परत समोर आले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.