ETV Bharat / state

उल्हासनगरात 'स्वाईन फ्लू' मुळे वृद्धाचा मृत्यू, साथीच्या रोगांचा वाढतोय प्रभाव - 70 years old man died in Ulhasnagar

उल्हासनगरातील एका 70 वर्षीय वृद्धाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. संपत राऊत (वय 70) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राऊत यांना एका आठवड्यापासून स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले होते.

उल्हासनगरमध्ये स्वाईन फ्लू मुळे वृद्धाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 22, 2019, 10:08 PM IST

ठाणे - उल्हासनगरातील एका 70 वर्षीय वृद्धाचा आज स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. संपत राऊत, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राऊत यांना एका आठवड्यापासून स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना ठाण्यातील घोडबंदर रोडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

उल्हासनगरमध्ये स्वाईन फ्लू मुळे वृद्धाचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये स्वाईन फ्लू मुळे वृद्धाचा मृत्यू

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात साथीच्या रोगांच्या वाढत्या प्रभावामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी शांतीनगर परिसरात एका 17 वर्षीय मुलाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर संपत राऊत यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. एका आठवड्यापूर्वी त्यांना उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान केले. त्यानंतर राऊत यांना घोडबंदर येथे उपचारासाठी नेण्यात आले.

राऊत यांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला, याला उल्हासनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, मृत राऊत यांच्या नातेवाईकांसह शेजारील नागरिकांनाही स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी रोग प्रतिबंधक औषधे देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Intro:किट नंबर 319

Body:उल्हासनगरात स्वाइन फ्लूमुळे वयोवृद्धाचा मृत्यू

ठाणे : उल्हासनगरातील एका 70 वर्षीय वयोवृद्धला एक आठवड्यापासून स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते, त्यामुळे त्यांना ठाण्यातील घोडबंदर रोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला आहे. संपत राऊत वय 70 असे स्वाइन फ्लूच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या वयवृद्धाचे नाव आहे, ते उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील कुर्ला कॅम्प परिसरात राहत होते,
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात विविध साथ रोगांच्या वाढत्या प्रभावामुळे शहरातील नागरिक पुरते बेजार झाले आहे. त्यातच गेल्या 20 दिवसापूर्वी शांतीनगर परिसरात एका 17 वर्षीय मुलाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आज वयोवृद्ध संपत राऊत यांचा स्वाइन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. आठवड्याभरापूर्वीच त्यांना उल्हासनगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान दिल्यावर राऊत यांना ठाण्यातील घोडबंदर येथे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, या वृत्ताला उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राजा रिजवानी यांनी दुजोरा दिला आहे. तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे म्हटले आहे. मात्र अहवाल अद्याप आला नसून तो आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असे डॉक्टर रिजवान यांनी सांगितले. दरम्यान मृतक राऊत यांच्या नातेवाईकांसह शेजारील नागरिकांनाही स्वाइन फ्लू होऊ नये म्हणून याची दक्षता घेण्यासाठी त्यांना रोग प्रतिबंधक औषधे देण्यात आल्याची माहिती देखील डॉक्टर रिजवान यांनी दिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.