ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नवे ७ रुग्ण, आकडा १६९च्या घरात - कल्याण डोंबिवली

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 169 रूग्णांपैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 115 रुग्ण उपचार घेत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका
कल्याण डोंबिवली महापालिका
author img

By

Published : May 1, 2020, 7:22 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवलीमध्ये आज नव्याने कोरोनाच्या 7 रुग्णांची वाढ झाली असून 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 169 झाली आहे. यामध्ये डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांनी शंभरी गाठली आहे.

आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील 50 वर्षीय आणि 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर डोंबिवली पूर्वेतील 58 वर्षीय महिला आणि 8 वर्षीय बालिकेचा तर कल्याण पूर्वेतील 31 वर्षीय महिलेचा देखील सामावेश आहे. हे पाचही रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांचे सहवासित आहेत. तर मुंबई येथील शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स असणाऱ्या कल्याण पूर्वेतील 44 वर्षीय महिलेचा आणि 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 169 रूग्णांपैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 115 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 169 रुग्णांची विगतवारी पाहता कल्याण पूर्व 34, कल्याण पश्चिम 21, डोंबिवली पूर्व 59, डोंबिवली पश्चिम 43, मांडा टिटवाळा 6, मोहने 6, नांदिवली 1 या भागातील रुग्ण असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लवंगारे यांनी दिली आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनचे उल्लंघन : शेकडो गाड्या पोलीस ठाण्यात जमा, वर्तकनगर पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.