ETV Bharat / state

आयसिस दहशतवादी संघटनेच्या ७ जणांना भिवंडीतून अटक; दहशतवादी संघटनेच्या संशयितांची संख्या अकरावर - NIA Raid

NIA Raid In Thane : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गाव आणि भिवंडीतील निजामपूरा, इस्लामपूरा आणि तीन बत्ती परिसरात ९ डिसेंबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास छापेमारी करत 'आयसिस' दहशतवादी संघटनेच्या संशयित ७ आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

NIA Raid In Thane
ठाण्यात NIA चा छापा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 5:32 PM IST

आयसिस दहशतवादी संघटनेच्या आणखी ७ जणांना भिवंडीतून अटक

ठाणे NIA Raid In Thane : महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून एकूण १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच कर्नाटकमध्येही एनआयएची दहशतवादी संघटनेच्या संशियत ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. शाकिब नाचन, हासिब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सूसे, फिरोझ कुवार, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राझील नाचन, शकूब दिवकर, कासीफ बेलारे, मुंझिर केपि, अशी अटक केलेल्या १५ आरोपींची नावं असून यापूर्वी एनआयएने यामधील ४ जणांना भिवंडीतील पडघा-बोरीवलीतून ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यामुळं आता भिवंडीतून एनआयएने कारवाई केलेल्या दहशतवादी संघटनेच्या संशयितांची संख्या अकरावर पोहचली आहे.

पाच आरोपींच्या सहकार्याने केलं काम : अटक सर्वजण दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसच्या प्रशिक्षण आणि बॉम्ब बनवून त्याची चाचणी करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान यापूर्वी अटक केलेल्या आरोपींपैकी शमील साकीब नाचण हा अकिब नाचणं, जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह इतर पाच आरोपींच्या सहकार्याने काम करत होता. यापूर्वी अटक केलेला अकिब हा शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना भाड्याने खोली देऊन त्यांना आर्थिक मदत करत असल्याचं तपासात समोर आलं होतं.

आयसिसमध्ये काही तरुणांची भरती : एनआयए अधिकाऱ्यांच्या तपासात अटक केलेल्या यापूर्वीचे पाच जण, त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचं समोर आलं होतं. या चौघांनी आयईडी आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिलं. आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती. ज्यात आयईडी, लहान शस्त्रे, पिस्तूल बनवणे, आदीची माहिती होती. त्याशिवाय, त्यांच्या परदेशस्थित आयसीस या हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री तयार केली होती, असंही एनआयएनं म्हटलं आहे.

गेल्या दोन वर्षात संशयिताना ताब्यात घेऊन अटक : २८ जून २०२३ रोजी एनआयए पथकाने नोंदवलेल्या आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणीच्या संशयतीच्या घरांची झडती घेण्यात आली होती. त्यावेळीही एनआयए पथकाने काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे यासारखी अनेक गुन्हे करणारे साहित्य जप्त केले होते. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारत विरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी वापर केल्याचं समजले होते. गेल्याच वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक आणि दहशतवादी कृत्यांत सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. शिवाय मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षात संशयिताना ताब्यात घेऊन अटक केली होती. तर २०१४ साली कल्याणमधून चार तरुण आयसिसमध्ये भरती झाले होते. त्यामुळं ठाणे जिल्ह्यात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचं समजते.

हेही वाचा -

  1. राबोडी येथे NIA ची धाड; बापे कुटुंबाची केली चार तास कसून चौकशी, मोबाईल घेतला ताब्यात
  2. एनआयएचे महाराष्ट्रात 43 ठिकाणी छापे: 15 जणांना अटक
  3. Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएला मोठं यश, आठव्या आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.