ETV Bharat / state

भिवंडीत डेंग्यूचे ६ बळी, पालिका प्रशासन खळबळून जागे

author img

By

Published : Nov 5, 2019, 6:48 PM IST

यंदा परतीच्या पावसाने कहर केल्याने शहर महापालिका क्षेत्रात डेंग्यूसह साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. डेंग्यूच्या लागणसह शेकडो रुग्ण टॉयफाईड, मलेरिया आदी आजाराने फणफणले आहेत. शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे उघड झाले आहे.

भिवंडीत डेंग्यूचे ६ बळी

ठाणे - भिवंडी पालिकेच्या हद्दीत दोन महिन्यात डेंग्यूने ६ नागरिकांचे बळी गेले आहेत. सुमारे १५० हून अधिक नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर शेकडो रुग्ण टॉयफाईड, मलेरिया आदी आजाराने फणफणले आहेत. यामुळे २ महिने सुस्त असलेले पालिका प्रशासन एकट्या डेंग्यूने ६ बळी घेतल्यावर खळबळून जागे झाल्याची चर्चा भिवंडीकर करताना दिसत आहे.

भिवंडीत डेंग्यूचे ६ बळी, पालिका प्रशासन खळबळून जागे

यंदा परतीच्या पावसाने कहर केल्याने शहर महापालिका क्षेत्रात डेंग्यूसह साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. डेंग्यूच्या लागणसह शेकडो रुग्ण टॉयफाईड, मलेरिया आदी आजाराने फणफणले आहेत. शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या घटनेची खबरदारी घेऊन प्रभाग अधिकारी, स्वच्छता आरोग्य विभाग व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करून शहरात साफसफाई व स्वच्छता करण्याचे निर्देश दिल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

dengue in bhivandi thane
प्रभारी महिला वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना रडू कोसळले

हे वाचलं का? - नागपुरात तब्बल २९ शाळेत डेंग्यूच्या अळ्या; ५ हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

भिवंडी शहरातील विविध परिसरात दिवसभर स्वच्छता, औषध व धूर फवारणी करून जनजागृती मोहिम राबवून नागरिकांना डेंग्यू आजारापासून सतर्क केले. डेंग्यूसह साथीचे आजार नागरिकांच्या जीवावर उठल्याने याविरोधात नागरिकांमधून पालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने उपाययोजना हाती घेतली आहे. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना सतर्क केले जात आहे. त्यासाठी लाऊड स्पिकरवरून दवंडी पिटण्यात येत आहे. तसेच घरोघर हस्त पत्रकांचे वाटप देखील करण्यात आले. डेंग्यूचे मच्छर स्वच्छ पाण्यात वाढत असतात. त्यामुळे घरासमोर प्लास्टिक आणि टाकीत पाणी साठवण्यात आल्याचे निदर्शनास येताच सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव व त्यांच्या पथकाने ठिकठिकाणच्या प्लास्टिक टाकीत साठवलेले पाणी फेकून दिले. स्वच्छ पाणी जास्त दिवस टाक्यांमधून साठवण्यात येऊ नये, तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.

हे वाचलं का? - जिल्ह्यात बदलत्या वातावरणात साथीच्या रोगाची लागण; सहा महिन्यात हिवतापाचे 61 तर डेंग्यूचे 23 रुग्ण​​​​​​​

दरम्यान, यंदा रेकॉर्ड ब्रेक झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच नागरिकांना उत्तम दळणवळणासाठी सोयीचे रस्ते तयार करू. तसेच शहरात डेंग्यू व साथीच्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागला आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी पालिका सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पालिका क्षेत्रातील १५ आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत १३८ डेंग्यूचे रुग्ण महिनाभरात आढळून आले आहेत, तर डेंग्यूच्या आजाराने ५ जणांचे बळी गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत असल्याची नोंद पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नसल्याची कबुलीही आयुक्तांनी दिली. नागरिकांना साथीचे आजार जडू नये यासाठी नागरी वस्तीतील गटार व परिसर स्वच्छ करून जीवघेण्या डासांची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याची माहिती देखील आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी प्रत्रकारांशी बोलताना दिली.

हे वाचलं का? - सांगलीत डेंग्यूचे थैमान; दोघांचा मृत्यू, तर चौघांना लागण

प्रभारी महिला वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना रडू कोसळले -
आयुक्तांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बुशरा शेख यांच्यावर एका प्रत्रकाराने आरोग्य सेवा पुरवण्यात हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप केला. हा आरोप असह्य झाल्याने डॉ. बुशरा शेख या पत्रकार परिषद संपताच धाय धाय रडू लागल्या. त्यांनी झालेल्या आरोपाचे दुःख व्यक्त केले. त्या पालिकेच्या क्षयरोग विभाग प्रमुख आहेत. मात्र, विद्यमान वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे हे १५ दिवस रजेवर असल्याने तात्पुरता प्रभारी पदभार डॉ. बुशरा शेख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शहरात साथीच्या आजारांचा कहर सुरू झाल्याने डॉ. बुशरा शेख या स्वतः आरोग्य पथकासह पालिका क्षेत्रात उपाययोजना करीत आहेत. असे असताना निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने आरोप करण्यात आला असल्याचे डॉ. बुशरा शेख म्हणाल्या.

Intro:kit 319Body:भिवंडीत डेंग्यूचा डंक ; डेंगूच्या आजाराने ६ बळी गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग

ठाणे ; भिवंडी पालिकेच्या हद्दीत दोन महिन्यात डेंगूने सहा नागरिकांचे बळी गेले असून सुमारे १५० हून अधिक नागरिकांना डेंगूची लागण तर शेकडो रुग्ण टॉयफाईड ,मलेरिया आदी तापाच्या आजाराने फणफणले आहेत. यामुळे २ महिने सुस्त असलेले पालिका प्रशासन एकट्या डेंगूच्या आजाराने ६ बळी गेल्यावर खडबडून जागे झाल्याची चर्चा भिवंडीकर करताना दिसत आहे.

यावर्षीच्या परतीच्या पावसाने कहर केल्याने शहर महानगर पालिका क्षेत्रात डेंगूसह साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. डेंगूच्या लागणसह शेकडो रुग्ण टॉयफाईड ,मलेरिया आदी तापाच्या आजाराने फणफणले आहेत. त्यामुळे शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे उघड झाल्याने या घटनेची खबरदारी घेऊन प्रभाग अधिकारी ,स्वच्छता आरोग्य विभाग व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करून शहरात साफसफाई व स्वच्छता करण्याचे निर्देश दिल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

भिवंडी शहरातील विविध परिसरात दिवसभर स्वच्छता ,औषध व धूर फवारणी करून जनजागृती मोहिम राबवून नागरिकांना डेंगू आजारापासून सतर्क केले. डेंगूसह साथीचे आजार नागरिकांच्या जीवावर उठल्याने याविरोधात नागरिकांमधून पालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने उपाययोजना हाती घेतली आहे. डेंगूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना सतर्क केले जात आहे. त्यासाठी लाउड स्पिकरवरून दवंडी पिटण्यात येत आहे. तसेच घरोघर हस्त पत्रकांचे वाटप देखील करण्यात आले.डेंगूचे मच्छर स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने त्याची माहिती नागरिकांना देऊन घरासमोर प्लास्टिक टाकीत पाणी साठवण्यात आल्याचे निदर्शनास येताच सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव व त्यांच्या पथकाने ठिकठिकाणच्या प्लास्टिक टाकीत साठवलेले पाणी उलथून टाकले. स्वच्छ पाणी जास्त दिवस टाक्यांमधून साठवण्यात येऊ नये तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.

दरम्यान, यावर्षी रेकॉर्ड ब्रेक झालेल्या पाऊसामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच नागरिकांना उत्तम दळणवळणासाठी सोयीचे रस्ते तयार करू तसेच शहरात डेंगू व साथीच्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागला आहे. त्यासाठी आवश्यक उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी पालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी पालिका सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पालिका क्षेत्रातील १५ आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत १३८ डेंगूचे रुग्ण महिनाभरात आढळून आले आहेत तर डेंगूच्या आजाराने पाच जणांचे बळी गेल्याचे त्यांनी संगीतले. मात्र शहरातील खाजगी रुग्णालयात डेंगूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत असल्याची नोंद पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नसल्याची कबुलीही आयुक्तांनी दिली. नागरिकांना साथीचे आजार जडू नये यासाठी नागरी वस्तीतील गटार व परिसर स्वच्छ करून जीवघेण्या डासांची उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे अशी माहिती देखील आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी प्रत्रकारांशी बोलताना दिली.

प्रभारी महिला वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना रडू कोसळले !
आयुक्तांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.बुशरा शेख यांच्यावर एका प्रत्रकाराने आरोग्य सेवा पुरवण्यात हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप केला. हा निरर्थक आरोप असह्य झाल्याने डॉ.बुशरा शेख ह्या पत्रकार परिषद संपताच धाय धाय रडू लागल्या. त्यांनी झालेल्या आरोपाचे दुःख व्यक्त केले. त्या पालिकेच्या क्षयरोग विभाग प्रमुख आहेत. मात्र विद्यमान वैद्यकीय अधिकारी डॉ.जयवंत धुळे हे १५ दिवस रजेवर असल्याने तात्पुरता प्रभारी पदभार डॉ.बुशरा शेख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शहरात साथीच्या आजारांचा कहर सुरु झाल्याने डॉ.बुशरा शेख या स्वतः आरोग्य पथकासह पालिका क्षेत्रात उपाय योजना करीत आहेत. असे असताना निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने आरोप करण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया डॉ.बुशरा शेख यांनी व्यक्त केली आहे. .

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.