ETV Bharat / state

राज्यात सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेलमध्ये केवळ ५६ टक्के मतदान

author img

By

Published : Oct 22, 2019, 1:59 AM IST

राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेलकरांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली खरी, पण यापूर्वीच्या निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पनवेलकरांचा निरुत्साह दिसून आला.

पनवेलमध्ये 56 टक्के मतदान

पनवेल - विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघात एकूण सुमारे ५६ टक्के मतदान झाले आहे. काही प्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. तर, राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेलकरांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली खरी, पण यापूर्वीच्या निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पनवेलकरांचा निरुत्साह दिसून आला.

सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता, परंतु सकाळी १० नंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पण दुपारी 1 नंतर मतदारांचा हाच उत्साह घसरला, आणि तो २८ टक्क्यांवर पोहोचला. हाच आकडा दुपारी ३ नंतर थोड्या प्रमाणात वाढला आणि तो ३८ टक्के झाला. पनवेलमधील अनेक सिडको वसाहतीत 'नो वॉटर नो वोट'चे बॅनर लावल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिडको वसाहतीतील नागरिकांनी पाठ फिरवली. या सर्वांचा परिणाम म्हणजेच मतदानाची टक्केवारी घटली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८ टक्के तर सायंकाळी ६ पर्यंत केवळ ५६ टक्क्यांवर पनवेलचे मतदान पार पडले.

गेल्या 50 वर्षांपासून नॉनस्टॉप मतदान करणाऱ्या आजी -

मतदानाचा दिवस अनेकांना आयती सुट्टीच वाटते. धडधाकट माणसेही मतदान टाळतात. हे चित्र म्हणजे अशा माणसांसाठी चपराक ठरावी. दिव्यांगांनी तर भरभरुन मतदान केलेच, पण पनवेलमधील व्ही. के. हायस्कुल मतदान केंद्रात एक आजी गेल्या 50 वर्षांपासून नॉनस्टॉप मतदान करत आल्या आहेत. या आजींवर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना बाहेर पडू नका, असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आपला मतदानाचा हक्का बजावला आहे. तरुणांपासून सगळ्यांसाठीच हे एक आदर्श उदाहरण आहे. आजींना गुडघे दुखीचाही त्रास आहे. मात्र कसलीही पर्वा न करता त्यांनी आपलं मतदान केलं. याशिवाय त्यांनी तरुणांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. या आजींसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी.

Intro:सोबत 121 जोडला आहे

पनवेल

विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघात एकूण सुमारे 56 टक्के इतके मतदान झाले. तुरळक प्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत झाली. राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेलकरांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली खरी, पण यापूर्वीच्या निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पनवेलकरांचा निरुत्साह दिसून आला.

Body:सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता, परंतु सकाळी 10 नंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पण दुपारी 1 नंतर मतदारांचा हाच उत्साह घसरला, आणि तो 28 टक्क्यांवर पोहोचला. हाच आकडा दुपारी 3 नंतर थोड्या प्रमाणात वाढला आणि तो 38 टक्के इतका झाला. पनवेलमधील अनेक सिडको वसाहतीत No Water No Vote चे बॅनर लावल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिडको वसाहतीतील नागरिकांनी पाठ फिरवली. या सर्वांचा परिणाम मतदानाची संख्या घटली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48 टक्के तर सायंकाळी 6 पर्यंत केवळ 56 टक्क्यांवर पनवेलचे मतदान पार पडले. Conclusion:गेल्या 50 वर्षांपासून नॉनस्टॉप मतदान करणाऱ्या आज्जी

मतदानाचा दिवस अनेकांना आयती सुटीच वाटते. धडधाकट माणसेही मतदान टाळतात. हे चित्र म्हणजे अशा माणसांसाठी चपराक ठरावी. दिव्यांगांनी भरभरुन मतदान तर केलेच. पण पनवेलमधील व्ही. के. हायस्कुल मतदान केंद्रात एक आज्जी गेल्या 50 वर्षांपासून नॉनस्टॉप मतदान करत आल्या आहे. या आज्जी गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना बाहेर पडू नका, असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्ष करत मतदान केलं आहे. तरुणांपासून सगळ्यांसाठीच हे एक आदर्श आहेत. आजींना गुडघे दुखीचाही त्रास आहे. मात्र कसलीही पर्वा न करता त्यांनी आपलं मतदान केलं. याशिवाय त्यांनी तरुणांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे.

या मतदानाचा रेकॉर्डब्रेक करणाऱ्या आज्जीशी संवाद वाढलाय आमच्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी...

121- प्रमिला पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.