ETV Bharat / state

Maharashtra APMC Election updates : राज्यात 47 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका; .'या' जिल्ह्यात निवडणुकीच्या धुराळ्यात भाजपा-शिंदे गट आमनेसामने - कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक

47 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर 30 एप्रिलला उर्वरित 88 बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान एकूण 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूकांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकी अंतर्गत एकूण 4 हजार 590 जागा निवडून द्यायच्या आहेत. उमेदवारांची संख्या 10 हजार 345 इतकी आहे. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 जागांपैकी 18 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी 6 हजार 230 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

APMC Election In State
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका
author img

By

Published : Apr 28, 2023, 9:24 AM IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात चार कृषी बाजार समितींच्या निवडणुकींचा धुराळा उडाला आहे. प्रचार अंतिम शिगेला पोहचला आहे. विशेष म्हणजे भाजपा शिंदे गट आमनेसामने लढत आहे. यामध्ये जिल्ह्यातील भिंवडी, शहापूर, मुरबाड आणि उल्हासनगर या चार बाजार समितीच्या निवडणूकांची रणधुमाळी उठली आहे. एप्रिलच्या भर उन्हात, अंगाची लाहीलाही होत असताना या निवडणुकामुळे वातावरणही तापले आहे. राज्यात भाजपा व शिंदे गट यांची युती सरकार असल्याने जिल्ह्यातील या निवडणुका देखील युतीत एकत्रपणे लढवल्या जात असल्याचे चित्र सुरवातीला दिसून आले होते. विशेष म्हणजे उल्हासनगर कृषी बाजार समितीमध्ये भाजपाने ५ जागा शिंदे गटाला दिल्या असताना देखील एकमेकांच्या विरोधात निवडणूका लढवीत आहेत.

जिल्ह्यात ६५ जागांसाठी १४६ उमेदवार : भिंवडी बाजार समितीत भाजप व शिंदे गटात युती आहे. येथे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसून आले आहे. यंदा निवडणुकीत अनेक आजी माजी संचालक, सभापती आपले नशीब अजमावत आहे. महाविकास आघाडीलाही बंडखोरीची लागण झाली आहे. जिल्ह्यातील चार कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण ६५ जागासाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये भिंवडी बाजार समितीत १४ जागांसाठी ३० उमेदवार, उल्हासनगर १७ जागांसाठी ३३ उमेदवार, शहापूर १७ जागांसाठी ४४ उमेदवार आणि मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ जागांकरिता ३९ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.

मतदार'मालामाल : जिल्ह्यात चार बाजार समितीच्या निवडणुकीत ७ जागा बिनविरोध निवडल्या आहे. यामध्ये भाजप व शिंदे गट आघाडीवर आहे. तसे पाहिले तर काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गट हे एकत्रीत निवडणूक लढवित असले, तरी त्यांच्यामध्ये सर्व अलबेल असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे बंडखोरीमुळे बाजार समितीवर कोणत्याही एका पक्षाला सत्ता मिळेल, अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे येत्या ३० एप्रिल रोजी बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कडक ऊन्हात वातावरण अधिक तापले आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या गटातील मतदारांना डायरेक्ट भेटण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यामुळे बाजार समितीचे मतदार'मालामाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.

३० एप्रिलनंतरच्या मतमोजणी : ठाणे जिल्ह्यातील चार बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप शिंदे गट एकत्र युती करून निवडणुका लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. जागा देण्याघेण्यावरुन दोघांमध्ये वितुष्ट आले आहे. यामुळे हे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून निवडणुकीत उभे राहिले आहे. यावेळी बंडखोर देखील जोरात आहेत. त्यामुळे मतदारांना भेटण्यात, त्यांना समजावून सांगण्यात उमेदवार तनमनधनाने जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. एकंदरीतच ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा कणा असलेल्या कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित होईल, हे ३० एप्रिलनंतरच्या मतमोजणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : Market Committee Election : अमरावती जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणुकीची लगबग; २९ जानेवारीला होणार मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.