ETV Bharat / state

सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा - सच्चिदानंद शेवडे - राष्ट्रपुरुषाची किंवा क्रांतीकारकाची कोणत्याही स्वरूपात कोणत्याही माध्यमातून केली जाणारी बदनामी बंद व्हावी

३१ व्या अखिल भारतीय एकदिवसीय स्वा. सावरकर संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव अन्य ५ ठरावाबरोबर संमेलनाध्यक्ष सच्चिदानंद शेवडे यांनी मांडला तर उपस्थितांनी हात उंचावून याला अनुमोदन दिले.

उपस्थितांना संबोधित करतांना सच्चिदानंद शेवडे
author img

By

Published : Jun 16, 2019, 10:25 PM IST

ठाणे - राष्ट्राच्या अपमानाने आपल्या भावना पेटून उठल्या असत्या तर फाळणीनंतर जगाच्या नकाशात पाकिस्तान दिसला नसता. पाकिस्तानचे ६ तुकडे होऊन लवकरच हा देश नष्ट होणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सावरकर अभ्यासक, साहित्यिक, प्रवचनकार व प्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

31st akhil bhartiy swa. sawarkar sammelan was held at kalyan in thane district
संमेलनात उपस्थित श्रोते

कल्याण येथे आयोजित ३१ व्या अखिल भारतीय स्वातत्र्यवीर सावरकर एकदिवसीय संमेलनातील अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठरावसह अन्य ५ ठराव संमेलनाध्यक्ष सच्चिदानंद शेवडेंनी मांडले तर उपस्थितांनी हात उंचावून याला अनुमोदनही दिले.

शेवडे यांनी सावकरांचे महान कार्यही उपस्थितांसमोर मांडले. सावरकरांपेक्षा आपला मोठेपणा दाखविण्याची विरोधकांची केविलवाणी धडपड सुरु आहे. या टीकाकारांमुळेच अनेकजण सावरकर वाचायला लागले असून यामुळे टीकाकारांचा खोटेपणा उघड होऊ लागला आहे. सावरकरांवर टीका करणाऱयांचे थोबाड बंद करण्यासाठी सावरकरांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात यावे. कोणत्याही पुरस्काराने सावरकर मोठे होणार नाहीत, तर तो पुरस्कारच मोठा होईल असे ते म्हणाले.

श्रद्धा ही माणसाची गरज असून हिंदूंची धर्मियांची श्रद्धा नष्ट केल्यास इतर धर्मियांच्या श्रद्धा हिंदुत्वावर आरूढ होतील. विकृत श्रद्धेच्या विरुद्ध समाजाची लढाई असली पाहिजे. देशाला घरात घुसून मारण्याची भाषा करणारा पंतप्रधान प्रथमच मिळाल्याचे ते म्हणाले.

या संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार विना विलंब देण्यात यावा, पोर्ट ब्लेअर नगरीला वीर सावरकरनगर असे नाव द्या, लंडन मधील निवासस्थान केंद्र किंवा राज्य सरकारने ताब्यात घ्यावे आणि त्याठिकाणी एखाद स्मारक तयार करावे, जयोस्तुते हे मंगलगीत शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, शालेय शिक्षणात किमान १ वर्ष तरी सैनिकी शिक्षणाचा अंतर्भाव करावा, राष्ट्रपुरुषाची किंवा क्रांतीकारकाची कोणत्याही स्वरूपात कोणत्याही माध्यमातून केली जाणारी बदनामी बंद व्हावी असे सहा ठराव मांडण्यात आले.

या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी 'काश्मीर वर्तमान आणि भविष्य' या विषयावर भाष्य केले. सावरकराच्या सुनबाई सुंदरा सावरकर यांची 'सावरकर घराण्यातील स्त्रियाचे योगदान' या विषयावर मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, डॉ उल्हास कोल्ह्टकर, डॉ. रत्नाकर फाटक यांचे 'भारत महासत्तेच्या दिशेने' या विषयावर व्याख्यान झाले.
या एकदिवसीय संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्य्क्ष तथा जेष्ठ साहित्यिक, प्रवचनकार, सावरकर अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कल्याण पश्चिमचे आमदार नरेद्र पवार हे स्वागताध्यक्ष होते. व्यासपीठावर महापौर विनिता राणे, केजीएसबी बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन प्रभाकर संत, आदि उपस्थित होते.

 ... तर फाळणी नंतर जगाच्या नकाशात पाकिस्तान दिसला नसता.. सच्चिदानंद शेवडे

ठाणे :- राष्ट्राच्या अपमानाने आपल्या भावना पेटून उठल्या असत्या तर फाळणी नंतर जगाच्या नकाशात पाकिस्तान दिसला नसता. पाकिस्तानचे ६ तुकडे होऊन लवकरच हा देश नष्ट होणार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ सावरकर अभ्यासक, साहित्यिक, प्रवचनकार  व प्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांनी कल्याणातील अखिल भारतीय स्वा सावरकर संमेलनात केले. या सम्मेलनात सावरकराना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव अन्य ५ ठरावा बरोबर  स्मेलनाध्यक्ष सच्चिदानंद शेवडे यांनी मांडला तर उपस्थितांनी हात उंचावून याला अनुमोदन दिले.

कल्याणात रंगलेल्या एकदिवशिय ३१ व्या अखिल भारतीय स्वा सावरकर संमेलनाचे आयोजन कल्याणातील केसी गांधी विद्यालयात करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्य्क्ष तथा जेष्ठ साहित्यिक ,प्रवचनकार ,सावरकर अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे  यांच्या हस्ते करण्यात आले. या समेलनाचे कल्याण पश्चिमचे आमदार नरेद्र पवार स्वागताध्यक्ष होते. तर व्यासपीठावर महापौर विनिता राणे, केजीएसबी बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन  प्रभाकर संतउपस्थित होते. या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी काश्मीर वर्तमान आणि भविष्य या विषयावर सावरकराच्या सुनबाई सुंदरा सावरकर यांची सावरकर घराण्यातील स्त्रियाचे योगदान या विषयावर मुलाखतज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरडॉ उल्हास कोल्ह्टकरडॉ. रत्नाकर फाटक यांचे भारत महासत्तेच्या दिशेने या विषयावर व्याख्यान झाले. 

समेलनाध्यक्ष पदी शेवडे यांनी सावकरचे महान कार्य उपस्थिता समोर मांडले. विरोधकाची आपण सावरकरा पेक्षा किती मोठे आहोत. हे दाखविण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. यामुळेच त्याच्यावर टीका केली जात असून वाईटातून ज्या प्रमाणे चांगले घडते तद्वतच टीकाकारामुळे अनेकजण सावरकर वाचायला लागले आहेत. सावरकर मुळापासून समजायला लागल्याने टीकाकाराचा खोटेपणा उघड होऊ लागला असल्याचे ते म्हणाले तर श्रद्धा ही माणसाची गरज आहे. हिंदू ध्र्मियाच्या श्रद्धा नष्ट केल्यास इतर धर्मियांच्या श्रद्धा हिंदुत्वावर आरूढ होतील म्हणूनच निरुपयोगी श्रद्धाना दुर्लक्षित करणे हा हिंदुत्ववादाचा गाभा असला पाहिजे. विकृत श्रद्धेच्या विरुद्ध समाजाची लढाई असली पाहिजे. देशाला घरात घुसून मारण्याची भाषा करणारा पंतप्रधान प्रथमच मिळाल्याचे ते म्हणाले. या संमेलनात सावरकराना भारतरत्न पुरस्कार विना विलंब देण्यात यावा,  पोर्ट ब्लेअर नगरीला वीर सावरकरनगर असे नाव द्यालंडन मधील निवासस्थान केंद्र किंवा राज्य सरकारने ताब्यात घ्यावे आणि त्याठिकाणी एखाद स्मारक तयार करावेजयोस्तुते हे मंगलगीत शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, शालेय शिक्षणात किमान १ वर्ष तरी सैनिकी शिक्षणाचा अंतर्भाव करावा, राष्ट्रपुरुषाची किंवा क्रांतीकारकाची कोणत्याही स्वरूपात कोणत्याही माध्यमातून केली जाणारी बदनामी बंद व्हावी असे सहा ठराव मांडण्यात आले.

दरम्यान, सावरकरावर टीका करणार्याची थोबाड बंद करण्यासाठी सावरकराना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कोणताही पुरस्कार सावरकराना दिल्याने सावरकर मोठे होणार नाहीत तर तो पुरस्कार मोठा होणार आहे. म्हणूनच सावरकरावर टीका करणार्याची थोबाड बंद करण्यासाठी सावरकराना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव बरोबर अन्य ५ ठराव स्मेलनाध्यक्ष सच्चिदानंद शेवडे यांनी मांडला तर उपस्थितांनी हात उंचावून याला अनुमोदन दिले.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.