ETV Bharat / state

ठाण्यात २ पिस्तूल, १२ जिवंत काडतुसांसह तीन शूटर्संना अटक; घातपात टळला

भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावींद्रा गावाच्या पाठीमागे असलेल्या गायत्रीनगर येथे तिघे 'शूटर्स' मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी सापळा लावून तिघांना १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ गावठी कट्टा आणि १२ जिवंत काडतूसांसह अटक केली.

ठाण्यात २ पिस्तूल, १२ जिवंत काडतुसांसह तीन शूटर्संना अटक; घातपात टळला
author img

By

Published : Jun 3, 2019, 10:55 AM IST

ठाणे - भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावींद्रा गावाच्या पाठीमागे असलेल्या गायत्रीनगर येथे तिघे 'शूटर्स' मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी सापळा लावून तिघांना १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ गावठी कट्टा आणि १२ जिवंत काडतूसांसह अटक केली आहे.

बाबू बबन मोहिते ( २२ रा. मुंब्रा कॉलनी, दिवा पूर्व ), मुस्ताक अलीम सय्यद ( २० रा.न्यू आझाद नगर, शांतीनगर ) आणि बबलू कैलास जैसवाल (२९ रा. नालासोपारा (प.) असे अटक केलेल्या शूटर्सची नावे आहेत. हे तिघेही भिवंडीत मोठा घातपात करणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश आंधळे यांना मिळाली. तेव्हा त्यांनी एपीआय धनंजय पोरे, अविनाश पाटील आदींच्या पोलीस पथकासह मुंबई- नाशिक जुन्या मार्गावरील गायत्रीनगर रोडवर सापळा रचला.

तेथे काही वेळाने होंडा डिओ स्कुटरवरून तिघे आले, पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी पोलीसांनी त्यांना पाठलाग करून पकडले आणि त्यांची झडती घेतली. या झडतीत १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ गावठी कट्टा व १२ जिवंत काडतुसे असा ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या घटनेचा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी अटकेत असलेल्या शूटर्सना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीराम पवार करत आहेत.

२ घातक अग्निशस्त्र व १२ जिवंत काडतुसेसह तिघा शूटर्सना  अटक; मोठा घातपात टळला 

ठाणे :- भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावींद्रा गावच्या पाठीमागील गायत्रीनगर येथे तिघे शूटर्स मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावून दोन अग्नी शस्त्र व १२ जिवंत काडतूसांसह तिघांना अटक केली आहे.

बाबू बबन मोहिते ( २२ रा.मुंब्रा कॉलनी, दिवा पूर्व ), मुस्ताक अलीम सय्यद ( २० रा.न्यू आझाद नगर, शांतीनगर ) व बबलू कैलास जैसवाल (२९ रा.नालासोपारा (प.) असे अटक केलेल्या शूटर्सची नांवे आहेत. हे तिघेही भिवंडीत मोठा घातपात करणार असल्याची खबर ठाणे जिल्हा ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश आंधळे यांना मिळाल्याने त्यांनी एपीआय धनंजय पोरे, अविनाश पाटील आदींच्या पोलीस पथकासह मुंबई – नाशिक जुन्या मार्गावरील गायत्रीनगर रोडवर सापळा लावला होता. त्यावेळी होंडा डिओ स्कुटरवरून तीन अनोळखी इसम आले त्यावेळी त्यांना थांबण्यास सांगितले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांना पाठलाग करून पकडले व त्यांची अंग झडती घेतली.

या अंग झडतीत १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ गावठी कट्टा व १२ जिवंत काडतुसे असा ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून  रविवारी अटकेतील शूटर्सना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीराम पवार करीत आहे.      

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.