ETV Bharat / state

Murder In Thane : डोक्यात दगड घालून 25 वर्षीय तरुणाची अंबरनाथमध्ये निर्घृण हत्या - डीएमसी कंपनीच्या आवारात हत्या

ठाण्यातील अंबरनाथमध्ये ( Ambarnath In Thane ) एका २५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला ( Murder In Thane ) आहे. बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात क्रिकेट खेळण्यास गेलेल्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

डोक्यात दगड घालून 25 वर्षीय तरुणाची अंबरनाथमध्ये निर्घृण हत्या

author img

By

Published : Jan 2, 2022, 7:32 PM IST

ठाणे : एकीकडे नववर्षाच्या रात्रीला तरुणाई स्वागत करत असतानाच ( New Year Celebrations ) त्याच दिवशी रंगात भंग करणारी घटना घडली आहे. एका २५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञात मारेकऱ्यांनी दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली ( Murder In Thane ) आहे. ही घटना अंबरनाथच्या डीएमसी कंपनीच्या आवारात घडली ( Ambarnath In Thane ) आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रवी तिवारी असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

डोक्यात दगड घालून 25 वर्षीय तरुणाची अंबरनाथमध्ये निर्घृण हत्या
क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या तरुणांमुळे घटना उघड

अंबरनाथ पश्चिमकडे बंद पडलेल्या डीएमसी कंपनीचे बोराक्स पावडर साठवण केंद्र होते. त्याठिकाणी परिसरातील काही स्थानिक युवक क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना डोक्यात दगड घातल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ कंपनीच्या वॉचमनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ पोलिस ठाण्याचे ( Ambarnath Police Station ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला.

मारेकऱ्यांचा शोध सुरु

स्थानिक तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मृत तरुणाचे नाव रवी तिवारी असून, तो अंबरनाथ पश्चिम भागातील लादीनाका येथील ठाकूर पाडा येथे राहत असल्याचे समजते. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.