ETV Bharat / state

घरावर वीज कोसळून 26 जण जखमी; ठाण्याच्या शहापूरमधील घटना - ठाणे शहापूर वीज कोसळली

शहापूर तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायत हद्दीत फणस पाडा येथील दोन घरांवर बुधवारी रात्रीच्या सुमारास वीज कोसळून 26 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.

25 Injured as lightning hit two houses in Thane District
घरावर वीज कोसळून 25 जण जखमी; ठाण्याच्या शहापूरमधील घटना
author img

By

Published : Oct 22, 2020, 8:36 AM IST

Updated : Oct 22, 2020, 10:01 AM IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच शहापूर तालुक्यातील दोन घरांवर बुधवारी रात्रीच्या सुमारास वीज कोसळून 26 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.

शहापूर तालुक्यातील फणसपाडा या आदिवासी पाड्यात थोराड कुटुंब राहते. काल सायंकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. त्यातच थोराड यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. यावेळी सर्व कुटुंबीय घरातच होते. या दुर्घटनेत थोराड कुटुंबासह शेजारी राहणाऱ्या पारधी कुटुंबातील सदस्यही जखमी झाले. दोन्ही कुटुंबातील एकूण 26 जण जखमी झाले आहेत.

घरावर वीज कोसळून 26 जण जखमी; ठाण्याच्या शहापूरमधील घटना

यासोबतच वीज कोसळल्यामुळे घराचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, सर्व जखमींवर शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच शहापूर प्रशासन घटनास्थळी रवाना झाले आहे.

Last Updated : Oct 22, 2020, 10:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.