ETV Bharat / state

ठाणे : भिवंडी तालुक्यात 40 दुचाक्या घसरुन 25 जण जखमी, 'हे' आहे कारण - भिवंडी

भिवंडीतील पोगांव फाटा ते मिल्लत नगर या दीड किलो मीटरच्या रस्तावर एका मगे एक असे 40 दुचाक्या घसरल्याने 25 दुचाकीस्वार जखमी झाले.

घसरताना दुचाकीस्वार
घसरताना दुचाकीस्वार
author img

By

Published : Jan 18, 2020, 10:08 PM IST

ठाणे - नाशिकच्या एका बियरच्या फॅक्टरीमधून निघणारा टाकाऊ द्रव्य पदार्थ टँकरमधून रस्त्यावर सांडल्याने 40 दुचाकीस्वार घसरून विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील पोगांव फाटा ते मिल्लत नगर या दीड किलो मीटरच्या रसत्यावर घडली.

या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. फैजान शेख (वय 46 वर्षे, रा. नाशिक) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

हेही वाचा - चावा घेत चोरी करणाऱ्या दोघांना पाच दिवसांची कोठडी

नाशिक येथून बियर कंपनीमधून टाकाऊ पदार्थ घेऊन टँकर चालक फैजान शेख हा नेहमीप्रमाणे भिवंडी तालुक्यातील कामण (वसई) येथील तबेल्यात घेऊन चालला होता. मात्र, टँकरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक द्रव्य भरलेले असल्याने ते भिवंडीतील पोगांव फाटा ते मिल्लतनगर या रस्त्यावर सांडले होते. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या दुचाकी एकापाठोपाठ एक घसरून अपघात घडला. या अपघातात अनेक तरुण जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा - भिवंडीत अन्न निरिक्षकाच्या कारवाईत 2 कोटी 75 लाखांचा गुटखा जप्त

या अपघाताच्या घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाला मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दिपक भोई व अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर तात्काळ पाण्याचा फवारा मारला. दोन तासात रस्त्यावर सांडलेला दारूचा टाकाऊ द्रव्य पदार्थ धुवून काढून त्यावर माती टाकून वाहतुकीमधील अडथळा दूर केला. या अपघातात सुमारे 25 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - 'तो' व्हिडिओ अर्धवट, कायदेशीर कारवाई करणार - नगरसेवक चव्हाण

Intro:kit 319Body:टँकरमधून रोडवर सांडलेल्या दारूच्या टाकाऊ द्रव्य पदार्थावरून ४० बाईकस्वारांचा घसरून अपघात

ठाणे: नाशिकच्या एका बियरच्या फॅक्टरीमधून निघणारा टाकाऊ द्रव्य पदार्थ टँकरमधून रोडवर सांडल्याने ४० दुचाकीस्वार घसरून विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील पोगांव फाटा ते मिल्लत नगर या दीड किमी.पर्यंतच्या रोडवर घडली आहे.
याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. फैजान शेख ( ४६ रा.नाशिक ) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
नाशिक येथून बियर कंपनीमधून टाकाऊ पदार्थ घेऊन टँकर चालक फैजान शेख हा नेहमीप्रमाणे भिवंडी तालुक्यातील कामण ( वसई ) येथील तबेल्यात घेऊन चालला होता. मात्र टँकरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक द्रव्य भरलेले असल्याने ते भिवंडीतील पोगांव फाटा ते मिल्लतनगर या दीड किमी.पर्यंतच्या रोडवर सांडले होते. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांच्या दुचाकी एकापाठोपाठ एक घसरून अपघात घडला. या अपघातात अनेक तरुण जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
या अपघाताच्या घटनेटची माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाला मिळताच एपीआय दिपक भोई व अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दल जवानांनी रोडवर तात्काळ पाण्याचा फवारा मारून दोन तासातच रस्त्यावर सांडलेला दारूचा टाकाऊ द्रव्य पदार्थ धुवून काढून त्यावर माती टाकून वाहतूकीमधील अडथळा दूर केला. या अपघातात सुमारे २५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.