ETV Bharat / state

गिर्यारोहणासाठी गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

पनवेल जवळील पोदी-1 येथे राहणारा अनुराग गुडीले (वय 22) हा तरुण शनिवारी मित्रांसोबत गिर्यारोहणासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. त्याचा मृतदेह पनवेल तालुका पोलिसांना मंगळवारी कलावंतीन बुरुजाजवळ आढळला.

22 year old trekker from panvel found dead near machi prabal area
गिर्यारोहणासाठी गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह
author img

By

Published : Nov 4, 2020, 10:28 AM IST

नवी मुंबई - पनवेल जवळील माची प्रबळ येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आज पनवेल तालुका पोलिसांना व शोध पथकाला कलावंतीन बुरुजाजवळ आढळला. यामुळे पोदी परिसरात शोककळा पसरली आहे.

पनवेल जवळील पोदी-1 येथे राहणारा अनुराग गुडीले (वय 22) हा तरुण शनिवारी मित्रांसोबत गिर्यारोहणासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु त्यानंतर त्याचा संपर्क होत नसल्याने सोमवारी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन घेतले असता ते माची प्रबळ परिसरात आढळून आले. तालुका पोलीस ठाण्याची हद्द ही पनवेल तालुका पोलिसांची असल्याने विशेष पथक व तरुण वर्ग त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेले असता तेथे त्याचा मंगळवारी मृतदेह आढळून आला.

हरहुन्नरी तरुण गेल्याने हळहळ

सदर घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच अनुराग सोबत कोण मित्र होत याचाही पोलीस शोध घेत आहेत. संबधित तरुणास गिर्यारोहणासोबत, फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. तसेच तो सर्पमित्रही होता. त्यामुळे पनवेल परिसरात सर्वपरिचित होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - केडीएमसीच्या फुटपाथ क्लिअरन्स मोहिमेला भाजपचा विरोध ; अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल

हेही वाचा - भिवंडी तहसील कार्यालयाबाहेर ओबीसी संघर्ष समितीची निदर्शने, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.