ETV Bharat / state

भिवंडीत २१ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - ashish shelar murder thane

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञातांनी आकाशला त्याच्या मोबाईलवर संपर्क करून त्याला गावानजीक एका शेतात बोलावले. त्याठिकाणी त्याचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली.

आकाश नारायण शेलार
आकाश नारायण शेलार
author img

By

Published : Sep 12, 2020, 7:20 PM IST

Updated : Sep 13, 2020, 3:00 PM IST

ठाणे - भिवंडीत २१ वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकर्‍याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात घडली असून याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश नारायण शेलार (वय २१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात आपल्या कुटुंबासह रहात होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंदनजीक असलेल्या जिंदाल कंपनीत कामाला होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने त्याच्या मोबाइलवर संपर्क करून त्याला गावानजिक असलेल्या एका शेतात बोलावले. त्याठिकाणी त्याची हत्या करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. आकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरा अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पडघा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा- शिवसेना नवी मुंबई उपशहर अध्यक्षावर माथेफिरूचा हल्ला

Last Updated : Sep 13, 2020, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.