ETV Bharat / state

देशी बनावटीचे पिस्तूल, ३ जिवंत काडतुसांसह 2 गुन्हेगार जेरबंद; ठाण्याच्या भिवंडीतील प्रकार

भिवंडी परिमंडळच्या हद्दीत अवैध धंदे आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या आदेशवरून निजामपुरा पोलीस ठाण्याचे वपोनि, विजय डोळस यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुरा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमलदार गस्तीवर होते.

arrested accused
अटक करण्यात आलेले आरोपी.
author img

By

Published : Dec 23, 2020, 6:33 PM IST

Updated : Dec 23, 2020, 8:31 PM IST

ठाणे - भिवंडीत देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसांसह गुन्हेरागांच्या दुकलीला अटक करण्यात आले आहे. निजामपूरा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मोहंमद हनीफ नईमुद्दीन शेख (वय २९, रा. नदीनाका, भिवंडी) आणि सैफ एजाज मोमीन (वय २४, रा. म्हाडा कॉलनी, भिवंडी ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण माहिती देताना.
खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी रचला सापळा

भिवंडी परिमंडळच्या हद्दीत अवैध धंदे आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या आदेशवरून निजामपुरा पोलीस ठाण्याचे वपोनि, विजय डोळस यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुरा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमलदार गस्तीवर होते. यानुसार स. फौ. खान यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत भिवंडीत पिस्तूलसह काडतूसे घेऊन दोन गुन्हेगार भिवंडीतील मिल्लतनगर, परिसरात येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या पथकाने सापळा रचला होता. त्यावेळी मोहंमद शेख आणि सैफ मोमीन यांच्या संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक स्टिल बॉडीचे असलेले देशी बनावटीचे मॅगझीन असलेले पिस्तूल, ३ पितळी घातुची जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व ६६ रू. रोख, असा एकूण ३५ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हेही वाचा - भिवंडी महापालिकेतील १८ फुटीर काँग्रेस नगरसेवकांचा गट राष्ट्रवादीच्या गळाला?

पिस्तूल आणि काडतुसे कुठून आणि कशासाठी ?

याप्रकरणी निजामुपरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्या, दरोडा, वा कुणाची तरी हत्या करण्याचा या दोघांचा प्रयत्न असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच हे पिस्तूल आणि काडतुसे या दुकलीने कुठून आणि कशासाठी आणली, याचा तपास पोलीस करत असल्याचे उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सांगितले.

Last Updated : Dec 23, 2020, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.