ठाणे - भिवंडी शहरात एक व ग्रामीण भागात एक अशा दोन नव्या कोरोनाग्रस्त रुग्णाची वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री ग्रामीण भागातील डुंगे गावातील बीएमसीत आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरात देखील आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, 25 वर्षीय महिला कलिना कुर्लावरून एक तारखेला शहरांमध्ये आले असता त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरातील सुमारे दहाहून अधिक गावांमध्ये शांतता पसरली होती. शुक्रवारी सकाळी खारबाव प्राथमिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी डुंगे गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. तर ग्रामपंचायतीच्यावतीने परिसर सील करण्यात आला आहे. या नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या 14 वर पोहचली आहे. रुग्णाच्या परिवारातील सर्वच व्यक्तींना रात्रीच भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात हलविण्यात आले आहे.
ग्रामीण मधील आज तीन रुग्ण बरे झाले असून, 11 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती भिवंडी गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे. भिवंडी शहरात देखील आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, 25 वर्षीय महिला कलिना कुर्लावरून एक तारखेला शहरामध्ये आली असता त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
वंजारपट्टी नाका परिसरातील रहिवासी आहेत. हा परिसर देखील मनपाने सील केला असून, या रुग्णामुळे भिवंडी शहरातील एकूण आकडा 21 वर पोहचला असून, त्यापैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. तर 19 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे. शहर व ग्रामीण रुग्णांचा एकूण आकडा आता 35 वर पोहचला असून यापैकी 5 रुग्ण बरे झाले आहेत.