ठाणे - कोरोनाच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारीचा आलेख उंचवला असल्याचे दिसून आले आहे. अशाच काळात भिवंडी पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली आहे. 14 लाखांच्या चोरी प्रकरणी दोन चोरट्यांच्या मुसक्या नारपोली पोलिसांनी आवळल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच गोदामातील 14 लाख 27 हजार 200 रुपये किमतीचे ब्रास व कॉपर शीट चोरी झाल्याची घटना भिवंडीतील श्रीराम कॉम्प्लेक्स, राहनाळ येथे घडली होती. या चोरीप्रकरणी व्यावसायिक संदीप प्रकाश शाह यांनी 22 ऑगस्ट रोजी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिली होती. या तक्रारानंतर नारपोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहिती व आपल्या गुप्त बतमीदारांमार्फत या चोरीच्या घटनेचा तपास लावला.
या प्रकरणी शैतानसिंग जसवंतसिंग सोळंकी (वय 33 वर्षे, रा. नागपाडा, मुंबई) व फारूक हसन शेख (वय 42 वर्षे, रा. कळवा) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनी गोदामातील ब्रास व कॉपर मेटल शीट चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आतापर्यंत 1 हजार 436 किलो वजनाचे 7 लाख 18 हजार 200 रुपये किंमतीच्या ब्रास शीट हस्तगत केल्या असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे करीत आहेत.
हेही वाचा - कोरोनाचा फटका..! केडीएमसीचा 2 हजार 139 कोटींचा अर्थसंकल्प ऑनलाईन मंजूर