ETV Bharat / state

मित्राच्या वाढदिवसाला जाणाऱ्या कॉलेज युवकावर काळाचा घाला - आदित्य संतोष भोईर अपघात

कॉलेजमधील मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अन्य मित्रांसोबत, दुचाकीवरून जात असताना एका धोकादायक वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कॉलेज युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मुरबाड रोडवरील जांभुळपाडा येथे घडली आहे.

17 years old college boy died in road accident near Jambhulpada
मित्राच्या वाढदिवसाला जाणाऱ्या कॉलेज युवकावर काळाचा घाला
author img

By

Published : Oct 4, 2020, 1:58 PM IST

ठाणे - कॉलेजमधील मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अन्य मित्रांसोबत, दुचाकीवरून जात असताना एका धोकादायक वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कॉलेज युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मुरबाड रोडवरील जांभुळपाडा येथे घडली आहे. या घटनेत दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. आदित्य संतोष भोईर (वय १७ रा. पिंपळघर, ता. भिवंडी) असे मृत युवकाचे नाव आहे.

आदित्य हा कल्याण येथील बालक विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात १२वीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी आदित्य अन्य दहा मित्रांसोबत दुचाकींवरून बदलापूर नजीक असलेल्या बारवी डॅम येथे चालला होता. मात्र भरधाव दुचाकी जांभुळपाडा येथे एका वळणावर घसरून ती थेट नाल्यात पडली. त्यामुळे दुचाकी नाल्यातील दगडावर आदळल्याने आदित्यच्या छातीला, डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला.

आदित्यला बेशुद्ध अवस्थेत अन्य मित्रांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाती मृत्यूची नोंद कल्याण तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मित्राचा वाढदिवस जीवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - हाथरस पीडितेच्या कुटुंबासोबत आम्ही खंबीरपणे उभे - शिवसेना

हेही वाचा - पतपेढी व्यवस्थापकाची गळफास घेत कार्यालयातच आत्महत्या; ठाण्यातील ठाकुर्ली येथील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.