ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवशी १३ कोरोनाग्रस्त; रुग्णांची संख्या ७३ वर, २६ जणांना डिस्चार्ज - thane corona updates

एक रुग्ण कल्याण पूर्वेत आढळून आला. यामुळे कल्याण-डोंबिवली हद्दीत रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. यामधील २ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २६ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवशी १३ कोरोनाग्रस्त; रुग्णांची संख्या ७३ वर, २६ जणांना डिस्चार्ज

author img

By

Published : Apr 18, 2020, 10:27 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज अचानक १३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. १३ रुग्णांपैकी ६ रुग्ण डोंबिवली पूर्वेत तर ६ रुग्ण डोंबिवली पश्चिम परिसरात आढळून आले. एक रुग्ण कल्याण पूर्वेत आढळून आला. यामुळे कल्याण-डोंबिवली हद्दीत रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. यामधील २ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २६ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज आढळून आलेल्या १३ रुग्णांमध्ये एका वर्षाच्या बालिकेचा समावेश असून ती डोंबिवली पश्चिम परिसरात राहणारी आहे. डोंबिवली पश्चिमेकडील ६८ वर्षीय महिलेचाही यात समावेश आहे. तसेच डोंबिवली पश्चिमेकडीलच रहिवाशी असलेले ४८ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय तरुण कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासात असल्याचे समोर आले आहे. डोंबिवली पश्चिमेकडीलच दुसऱ्या कुटुंबातील ४० वर्षीय महिला व ४२ वर्षीय व्यक्ती पण कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासात असल्याचे सांगण्यात आले असून आजच्या दिवसात डोंबिवली पश्चिम परिसरात अशी ६ रुग्ण आढळून आली आहेत.

डोंबिवली पूर्वेतही एकाच दिवसात ६ रुग्ण आढळून आले आहेत. डोंबिवली पूर्वेत नव्याने ४६ वर्षीय व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आली आहे. या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे, तर ५ रुग्ण कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ४२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय व्यक्ती, १७ वर्षीय तरुणी, १९ वर्षीय तरुण, ७० वर्षीय महिला हे पाचही कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबातील आहेत. कल्याण पूर्वेत ६५ वर्षीय व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हा रुग्ण लॉकडाऊनपूर्वीच कल्याण पूर्वेत विदेशातून आला होता.

दरम्यान, आज १३ रुग्ण आढळून आलेला परिसर सील करण्यात आला असून महापालिका क्षेत्रात आतापर्यत ७३ रुग्णांपैकी २ मृत्यू झाले आहे, तर २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. सद्यस्थितीत ४५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लवंगारे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.