नवी मुंबई - मुंबई मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. चार दिवसात कोरोनाग्रस्त रूग्णांची नवी मुंबईत झपाट्याने होतं आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाच्या रूग्णांसाठी हॉस्पिटलदेखील कमी पडत आहेत. त्यामुळे वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये 1100 बेडचं तात्पुरत कोविड रूग्णांलय उभारण्यात आलं आहे. हे रुग्णालय उपचारासाठी खुल केलं जाईल याची प्रतीक्षा सर्व स्तरात होती, ती प्रतिक्षा आता संपली असून हे तात्पुरते रुग्णालय रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत 3554 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 14538 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 105330 जण निगेटीव्ह आले असून, 465 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3543 इतकी आहे. आज 129 जण (12जून ) कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे मधील 22, बेलापूर मधील 17, कोपरखैरणे मधील 33, नेरुळ मधील 13 व वाशीतील 12, घणसोली मधील 19, ऐरोली मधील 8, दिघ्यातील 5 असे एकूण 129 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 53 स्त्रिया व 78 पुरुषांचा समावेश आहे.
शहरात 3543 इतका कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 2124 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर आज बेलापूर मधील 10, नेरूळ मधील 36, वाशी मधील 9, तुर्भे मधील 17, कोपरखैरणे मधील 18, घणसोली मधील 18, ऐरोली मधील 17, दिघा 3 अशा एकूण 126 व्यक्ती आज कोरोना मुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये 39 स्त्रिया आणि 87 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थिती मध्ये 1310 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 109 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.