सोलापूर - आदित्य ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंवाद यात्रेला सोलापुरात युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या जनसंवाद यात्रेच्यानिमित्ताने वालचंद महाविद्यालयात आयोजित 'आदित्य संवाद'मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्या. युवा खेळांडूसाठी क्रीडांगण, बस, बेरोजगारी, तरुणांना वेड लावणारे पब्जी सारख्या गेम्स अशा समस्यांवर चर्चा झाली.
सोलापूरातल्या वालचंद महाविद्यालयात आदित्य संवाद हा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी आदित्य यांच्या टीमने युवकांकडून 'युवांचा आदित्य' फॉर्म भरुन घेण्यात आला. त्यानिमित्ताने युवा मतदारांची माहिती आता आदित्य ठाकरे यांच्याकडे असणार आहे. तर तरुणांना टी-शर्ट आणि टोप्या देण्यात आल्यानंतर खुली चर्चा झाली. युवा सेनेची एक टीमही यानिमित्ताने गावोगावी जोरदार प्रचार करत आहे.