सोलापूर - पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. शहरातील पेट्रोल पंपावर रेडा बांधला आणि त्यासमोर पुंगी वाजवून निषेध केला. भैन्स के आगे बिन बजा के कुछ फायदा नही ,अशा घोषणा दिल्या.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणिक कोलमडले
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारच्या जनता विरोधी निर्णयामुळे सध्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. यात सातत्याने वाढ होत असून यांचा फटका बसून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाहनचालकांना, मालवाहतूकदारांना याचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढी विरोधात देशभरात रोज आंदोलने चालू आहेत. तरीही मोदी सरकारवर काहीच फरक पडत नाही. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी प्रतिकात्मक 'भैस के आगे बिन बजाओ आंदोलन', करण्यात आले. ज्या प्रमाणे रेड्यासमोर पुंगी वाजवून काही उपयोग नाही. त्याच प्रमाणे मोदी सरकारला काही फरक पडत नाही, असेच दिसते आहे. म्हणून म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे करगुळे म्हणाले.
हेही वाचा - सोलापूरमध्ये काँग्रेसचा अर्णव गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून आक्रोश