ETV Bharat / state

पंढरपूर : विरोधी उमेदवाराचा फोटो स्टेटस ठेवला म्हणून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

author img

By

Published : Jan 17, 2021, 8:39 PM IST

उमेदवाराचा फोटो स्टेट्‌स ठेवला म्हणून तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

young man threatened to kill for posting photo status of opposition candidate in pandharpur
पंढरपूर : विरोधी उमेदवाराचा फोटो स्टेटस ठेवला म्हणून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

पंढरपूर - मोबाईलवर उमेदवाराचा फोटो स्टेट्‌स ठेवला म्हणून तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चंद्रकांत सावंत, गणेश सुखदेव चिकणे, तुकाराम सुनील चिकणे, नागेश मधुकर शिंदे, श्रीकांत शरद चिकणे, इंद्रजीत सुखदेव चिकणे सर्व रा.गुळपोळी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

परत स्टेट्‌स ठेवला तर जिवंत सोडणार नाही -

शुभम दुसंगे (२२) हा गुळपोळी येथील बसस्थानकावर थांबला असताना अक्षय सावंत या आरोपीने त्याला तुझ्याकडे काम आहे, तू दूध संकलन केंद्रात ये, असा फोन करुन बोलावून घेतले. शुभम तेथे पोहोचल्यानंतर त्याला अक्षयने व्हाट्‌सऍपवर उमेदवार निरंजन चिकणे यांचे स्टेट्‌स का ठेवतो, असे विचारले. तसेच यापुढे स्टेट्‌स ठेवला तर तुझे हात-पाय मोडून हातात देईल, अशा धमक्या दिल्या. तेथून बाहेर येत असताना इंद्रजीत चिकणे यांनी शिवीगाळ केली. तर नागेश शिंदे याने त्याच्या कानशिलात मारली. तसेच परत स्टेट्‌स ठेवला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

हाेही वाचा - काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही; यशोमती ठाकुरांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.