ETV Bharat / state

बार्शीतील स्मशानभूमीत लाकडांचा अड्डा; ना परवानगी ना पावती

author img

By

Published : Jun 10, 2021, 4:28 PM IST

Updated : Jun 10, 2021, 7:34 PM IST

कोरोनाच्या काळात अनेकांनी जनसेवेचे व्रत हाती घेतले आणि ते यशस्वीही करून दाखवले. मात्र, प्रत्येकानेच हा वसा प्रामाणिकपणे पार पडला असे नाही. मरणानंतरही अर्थार्जनाचा हेतू ठेवणारी काही घटक समोर आले आहेत. दहनविधीसाठी किती लाकूड लागणार, यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून किती पैसे आकारले जाणार याबाबत बार्शी येथील वैकंठभूमीत सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा वेगळीकडे अंत्यसंस्कार केले जातात. तर उभारण्यात आलेल्या लाकडी अड्ड्यातूनच लाकूड खरेदीही करावी लागतो हे विशेष..

wood
स्मशानभूमीत परवानगीशिवाल लाकडांचा अड्डा सुरू

बार्शी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले होते. या प्रतिकूल परिस्थितीत अनेक सामाजिक संघटना रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी समोरही आल्या. हे जरी वास्तव असले तरी दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर दहनविधीसाठी लागणाऱ्या लाकडांची खरेदीसाठी चक्क स्मशानभूमीतच लाकडाचा अड्डा उभारण्यात आला आहे.

याकरिता ठेकेदाराने नगरपालिकेची केवळ तोंडी परवानगी घेलती आहे. शिवाय अंत्यविधीसाठी 3 हजार 500 ते 4 हजार रुपये मोजूनही नातेवाईकांना साधी पावतीही दिली जात नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण ताब्यात नाही पण अंत्यविधीसाठी पैसे नातेवाईकांना हजारो रुपये मोजावे लागले आहेत. हा सावळा गोंधळ कुणाच्या आशीर्वादाने असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • स्मशानभूमीतच लाकडांचा अड्डा -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण मृत्यूचे प्रमाण वाढले होते. बार्शीसारख्या शहरात दिवसाकाठी 18 ते 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. त्यामुळे येथील वैकंठ स्मशानभूमीत या रुग्णांचा अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली. शिवाय लगतच लाकडी अड्डाही थाटण्यात आला. केवळ मुख्याधिकारी यांच्या तोंडी सूचनेवरून सुरू झालेल्या या लाकडी अड्ड्यावर 300 ते 350 मन प्रमाणे लाकडाची विक्री होत आहे तर बाहेर हेच लाकूड 250 रुपये मनप्रमाणे विकले जात आहे. शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी नगरपालिकेच्या ठेकेदारानेच उभारलेल्या लाकडी अड्ड्यातून लाकूड खरेदी करावी लागत आहे. रुग्ण नातेवाईकांच्या मनस्थितीचा गैरफायदा या ठिकाणी घेतला जात आहे.

हेही वाचा - उघड्या गटारात पडल्या दोन महिला, घटना सीसीटीवीमध्ये कैद

यासंबंधी ठेकेदार अमित निकम यांना विचारणा केली असता, याकरिता मुख्याधिकारी यांची तोंडी परवानगी घेण्यात आल्याचे सांगितले आहे. परंतु, अंत्यविधी दरम्यान, वेळेनुसार आणि गरजेनुसार अधिकचे दर आकारले जात असल्याचा आरोप रुग्ण नातेवाईकांनी केला आहे. कोरोनाच्या काळात कोरोना योद्धा म्हणून अनेक सामाजिक संघटना, आरोग्य विभागातील कर्मचारी समोर आले आहेत. मात्र, नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून अशा ठेकेदारांनी कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीचा गैरफायदाही घेतला. या प्रकारामुळे कोरोनाचे वास्तव आणि त्यामुळे निर्माण होणारी दुसरी बाजू आज समोर आली आहे.

  • ना पावती ना परवानगी

कोरोनामुळे मृत्यू झालेला रुग्ण नातेवाईकांच्या ताब्यात नाही पण त्यांच्या अंत्यविधीसाठी तब्बल 4 हजार रुपये आकारले जात आहेत. मात्र, निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नातेवाईकांनीही याचा विचार केला नाही. पण अंत्यविधीसाठी जमा केलेल्या पैशाची पावतीही देण्यास ठेकेदाराने नकार दिला आहे. शिवाय मुख्याधिकारी यांच्या केवळ तोंडी सूचनेनुसार हा अड्डा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुडद्याच्या माथ्यावरील लोणी कोणी किती खाल्ले हा संशोधनाचा विषय बनला आहे.

  • बाजारभाव आणि स्मशानभूमीतील लाकूड दरात तफावत

कोरोनाशिवाय इतर आजाराने मृत्यू झालेल्यांसाठी 250 मन प्रमाणे लाकूड मिळत आहे तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी 3500 रुपये मोजावे लागत आहेत.

लाकडाचा हा अड्डा नगरपालिकेच्या हद्दीतच आहे. याकरिता मुख्याधिकारी यांची तोंडी परवानगी घेतली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा अड्डा उभारण्यात आला आहे. याचे टेंडर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे पावती देण्याचा विषय येत नाही, अशी प्रतिक्रिया ठेकेदार अमित निकम यांनी दिली आहे.

हेही वाचा - मुल्तानचे भगवान नृसिंह

Last Updated : Jun 10, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.