ETV Bharat / state

नात्याला काळीमा! पंढरपुरात बापानेच केला मुलीचा विनयभंग - मुलीसोबत अश्लील चाळे करण्याच प्रयत्न

2018 पासून जन्मदात्या पित्याने मुलीला अत्याचार करण्याच्या हेतूने दमदाटी व शिवीगाळ करून विनयभंग करत होता. असाच प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता.

बापानेच केला मुलीचा विनयभंग
बापानेच केला मुलीचा विनयभंग
author img

By

Published : Feb 8, 2021, 1:10 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये जन्मदात्या बापानेच स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नराधम बापाविरोधात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्या नराधमाविरोधात पोक्सो कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसापासूनची पंढरपूर तालुक्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

आईकडून पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये एक मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. मात्र 2018 पासून जन्मदात्या पित्याने मुलीला अत्याचार करण्याच्या हेतूने दमदाटी व शिवीगाळ करून विनयभंग करत होता. असाच प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता. मात्र 3 फेब्रुवारी रोजी जन्मदात्या बापाकडून लेकीचा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर आईने मुलीसोबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पतीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.

आठ दिवसांतील दुसरी घटना ...

विनयभंगाची आणखी एक घटना याच आठवड्यात पंढरपूर तालुक्यातल्याच एका गावांमध्ये घडली होती. याप्रकरणामध्ये आरोपीने तीन अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष दाखवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हा दुसरा प्रकार उघडकीस आल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.