ETV Bharat / state

सोलापुरात मास्कचा वापर बंधनकारक, थुंकल्यास होणार दंड - सोलापूर मास्क बातमी

सोलापूर येथे वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. सोबतच, रस्त्यावर थुंकण्यासही बंदी करण्यात आली आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाईक होणार आहे.

सोलापुरात मास्कचा वापर बंधनकारक, थुंकल्यास होणार दंड
सोलापुरात मास्कचा वापर बंधनकारक, थुंकल्यास होणार दंड
author img

By

Published : May 25, 2020, 9:45 AM IST

सोलापूर - येथे सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणं बंधनकारक असून रस्त्यावर थुंकण्यास बंदी करण्यात आली आहे. शिवाय दुकानदार यांनी मास्क बांधणं, हात मोजे घालणं बंधनकारक असून तसे न केल्यास आता शंभर ते पाचशे रुपये दंडाची कारवाई होणार आहे.

शहरात रविवारी आणखी 18 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे, एकूण संख्या 583 इतकी झाली आहे तर, मृतांची संख्या 51 वर पोहोचली आहे. एकूण 5 हजार 770 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील 5 हजार 543 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4 हजार 960 अहवाल निगेटिव्ह तर 583 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 227 अहवाल प्रतिक्षेत आहेत. रविवारी एका दिवसात 120 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 102 निगेटिव्ह तर, 18 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तसेच, रविवारी 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे तर, 5 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

रविवारी रुग्ण मिळालेले विभाग पुढीलप्रमाणे -

घोंगडेवस्ती भवानी पेठ 1 पुरुष

शनिवार पेठ 1 महिला

निलमनगर 2 महिला

शास्त्री नगर 1 पुरुष

रविवार पेठ 1 पुरुष, 1 महिला

सलगरवस्ती डोणगांव रोड 1 पुरुष

दमाणीनगर 1 महिला

गंगानगर 1 महिला

न्यू पाच्छा पेठ 2 पुरुष

मजरेवाडी 1 पुरुष

एमआयडीसी रोड 1 महिला

सबजेल 1 पुरुष

मुळेगांव रोड 1 महिला

वरद फार्म पुणे रोड 1 पुरुष

पाच्छा पेठ 1 पुरुष

रविवारी मृत्यू झालेल्या 5 जणांची माहिती पुढीलप्रमाणे -

80 वर्षीय पुरुष रा. कर्णिकनगर

65 वर्षीय महिला, मिलिंद नगर बुधवार पेठ

56 वर्षीय महिला जुना विडी घरकुल

79 वर्षीय पुरुष शोभादेवी नगर नई जिंदगी

65 वर्षीय पुरुष सलगरवस्ती डोणगांव रोड

आत्तापर्यंत बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या 254 असून 278 जणांवर उपचार सुरू आहेत. यात 143 पुरुष आणि 135 महिलांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.