ETV Bharat / state

'आम्हाला कोणाचीही विकेट घेण्याची गरज नाही' - bhagirath bhalake

महाविकास आघाडी सरकारचा कारभार लोकाभिमुख नसून कोणत्याही मंत्र्यांची विकेट घेण्याची आम्हाला गरज नाही चौकशी एजन्सी आपलं काम करत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

'आम्हाला कोणाचीही विकेट घेण्याची गरज नाही'

author img

By

Published : Apr 13, 2021, 9:52 AM IST

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार लोकाभिमुख नसून कोणत्याही मंत्र्यांची विकेट घेण्याची आम्हाला गरज नाही चौकशी एजन्सी आपलं काम करत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. महाविकास आघाडी सरकार हे प्रत्येक गोष्टीमध्ये बहाणेबाजी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

'आम्हाला कोणाचीही विकेट घेण्याची गरज नाही'

अजितदादांकडे फक्त बारामतीसाठी तिजोरीच्या चाव्या
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आले असता अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीच्या आपल्याकडे असल्याचे सांगितले होते. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या चाव्या पंढरपूरसाठी नसून फक्त बारामतीसाठी असल्याची टीका केली.

राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात कोरोना रुग्णांची संख्याही सर्वात जास्त आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या बेडची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. तरी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महाविकास आघाडीमुळे ओबीसी आरक्षण संकटात
महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर ओबीसींची जनगणना करण्यास सांगितले होते. मात्र राज्य सरकार याबाबत गंभीर दिसत नाही. याबाबत राज्य सरकारबरोबर बैठक घेण्यात आली. मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. महाविकास आघाडीच्या कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या जागांना स्थगिती मिळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

एक दिवसीय प्रचार दौरा

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे एक दिवसीय पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी मंगळवेढा येथे पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ, खा. जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, लक्ष्मणराव ढोबळे, प्रशांत परिचारक, विजयकुमार देशमुख, सुभाष बापू देशमुख, सदाभाऊ खोत, आमदार राम सातपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कलशेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.