सोलापूर - वाखरी येथील पालखी तळावर रिंगण सोहळा पार पडल्यावर सर्व संतांच्या दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. पंढरीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांना विठ्ठलाच्या पायाशी पोहोचून दर्शन घेता येत नाही. म्हणून अनेकजण मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन 'जातो माघारी पंढरी नाथा' असे म्हणत आपल्या गावाकडे परत जात आहेत.
मंदिरात दर 3 सेकंदाला एक वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेत असतो. मात्र, लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांना कमी कालावधीत दर्शन करणे शक्य नाही. म्हणून पायीवारी करणारे वारकरी कळस दर्शन घेत आहेत आणि हा आनंद सोहळा डोळ्यात साठवून गावाकडे जात आहेत ते....पुढच्या वारीच्या प्रतीक्षेत.