ETV Bharat / state

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

गेल्या बारा तासांपासून सलग सुरू असणाऱ्या पावसामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Oct 21, 2019, 8:37 AM IST

Updated : Oct 21, 2019, 12:46 PM IST

  • 11.am -माढ्यामध्ये निवडणुकीला गालबोट, दोन गटात हाणामारी
  • 10.17 am - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • 9.38 am - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले मतदान
  • 9.17 am - करमाळा मतदारसंघातील नेरले येथील बुथ क्रमांक 211 मध्ये पोलिंग एजंटांचे फॉर्म चोरीला गेले आहेत. याबाबात केंद्राध्यक्ष, पोलिंग एजंटांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

सोलापूर - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर तिसऱ्यांदा निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्या मागील दहा वर्षांपासून सोलापूर मध्यचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे मध्य मधून निवडणूक लढवित आहे. मात्र, आमचे मतदान हे सोलापूर दक्षिण विधानसभेसाठी आहे.

शिंदे कुटुंबियांनी केले मतदान
शिंदे कुटुंबियांनी केले मतदान

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर आपले नशिब आजमात आहेत. यावेळी त्यावेळी त्यांनी पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले मतदान

माकपचे नेते, माजी आमदार आणि माकपचे सोलापूर मध्यमधील उमेदवार कॉ. नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

आडम कुटुंबियांनी केले मतदान
आडम कुटुंबियांनी केले मतदान

सोलापुरातील बापूजी नगर ज्ञान सागर प्रशाला येथील मतदान केंद्रावर आपल्या परिवारासह त्यांनी मतदान केले. त्यांची पत्नी नगरसेविका कामिनी आडम, चिरंजीव डॉ. किरण आडम आणि त्यांची कन्या नीलिमा आडम यांनी ही मतदानाचा हक्क बजावला.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:mh_sol_01_adam_master_voting_7201168

माकप नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर -
माकपचे नेते आणि माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापुरातील बापूजी नगर ज्ञान सागर प्रशाला येथील मतदान केंद्रावर आपल्या परिवारासह आता मतदान केले. त्यांची पत्नी नगरसेविका कामिनी आडम, चिरंजीव डॉक्टर किरण आडम आणि त्यांची कन्या नीलिमा आडम यांनी ही मतदानाचा हक्क बजावला.
Body:mh_sol_01_adam_master_voting_7201168Conclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.