सोलापूर - जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर येथील शेतकऱ्यांचा राजवाडा समजला जाणाऱ्या 'विठ्ठल' सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तब्बल ( Vitthal Sakhar Karkharna Election ) अठरा वर्षांनंतर सत्तांतर झाले ( Abhijit Patil Panel Win ) आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान चेअरमन भगीरथ भालके - कल्याणराव काळे ( Bhagirath Bhalake Panel Lose ) आणि औदुंबर अण्णा पाटील गटाचे युवराज पाटील - गणेश पाटील - दीपक पवार गटाचा दारुण पराभव झाला आहे.
21 जागासाठी झाली निवडणूक - एकूण 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सहा गटातून व संस्था मतदारसंघातून ही निवडणूक लढवली गेली. अभिजीत पाटील यांच्या गटाने सुरुवातीपासूनच विजयाची आघाडी घेतली व ती आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. काल ( 6 जुलै ) रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरुवात झाली. एकूण सहा फेऱ्यांमध्ये व 20 टेबल वरती ही मोजणी आज ( 7 जुलै ) सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होती.
युवराज पाटील यांचा मतमोजणीवर आक्षेप - बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणी सुरुवात झाली होती. परंतु, पहिल्या फेरीचे निकाल हाती येण्यास सायंकाळचे पाच वाजले. दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर करण्यास रात्री बारा वाजले. दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर झाले नव्हते. तेव्हा युवराज पाटील गटांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत गंभीर आरोप केले, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अभिजित पाटील गटाने विजय संपादन केला - या निवडणूक मध्ये संस्था मतदारसंघातून कल्याणराव काळे यांचे लहान बंधू समाधान काळे यांची भालके गटातून एकमेव निवड झाली आहे. अभिजित पाटील यांच्या घड्याळाने 1700 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. तर, युवराज पाटील यांची शिट्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, विद्यमान चेअरमन भगीरथ भालके यांची कपबशी तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. दरम्यान, विधानसभा पोटनिवडणुकीनंतर भगीरथ भालके यांना दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागत आहे.
'या' कारणांमुळे भालकेंचा पराभव - विठ्ठल सहकाही साखर कारखाना हा पंढरपूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी राजवाडा समजला जातो. मात्र, हा कारखाना सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जात अडकला आहे. विठ्ठल कारखान्यावरती सध्या भालके गटाची सत्ता होती. मात्र, गाळपाचे बिल न देणे, कामगार, ऊस तोडणी मजुरांची देणी थकीत असल्याने भालके गट बॅकफूटवर गेला होता. त्यात आर्थिक अडचणींमुळे आणि कोट्यवधींचे कर्जे झाल्याने हा कारखाना गेली 2 वर्षे सुरु झालेला नाही. त्यामुळे भालके गटाचा भराभव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - Kiriti Somaiya : शिंदे गटातील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे घेताच सोमैयांची चुप्पी; राऊत, परबांना इशारा