पंढरपूर - श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आमलकी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल गाभाऱ्यात द्राक्ष व फुलाची तसेच रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. ही आरास रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकर पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! अँटिलियाजवळ आता सापडली बेवारस दुचाकी
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आमलकी एकादशीदिवशी श्रीविठ्ठलाच्या गाभाऱ्यात 100 किलो द्राक्षांचा वापर करून मनमोहक द्राक्षांची आरास तयार करण्यात आली. तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात एक हजार फुलांचा वापर करून सुरेख अशी आरास तयार केली. यात झेंडू, शेवंती, एरकेड, केळी खुंटे, द्राक्ष यांची रंगीबेरंगी आरास तयार करण्यात आली होती.
हेही वाचा - निलंबित कारागृह अधीक्षकांचा राष्ट्रपतींकडे इच्छामरणाचा अर्ज
विठ्ठल मंदिरात मोजक्याच भाविकांना प्रवेश..
विठ्ठल मंदिर समितीकडून एक हजार पाचशे भाविकांना मुख दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग असणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर प्रशासनाकडून कडक नियम लावण्यात आले आहे. त्यामुळे मोजक्या भाविकांना विठ्ठल मंदिरात प्रवेश देण्यात आला.