ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन, पंढरपूरमधील 5 हॉटेल सील

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आठवडी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र असे असताना देखील काही हॉटेल मालकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने, पंढरपूर शहरासह तालुक्यातील पाच हॉटेल सील करण्यात आल्या आहेत.

पंढरपूरमधील 5 हॉटेल सील
पंढरपूरमधील 5 हॉटेल सील
author img

By

Published : Mar 29, 2021, 7:45 PM IST

पंढरपूर - पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आठवडी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र असे असताना देखील काही हॉटेल मालकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने, पंढरपूर शहरासह तालुक्यातील पाच हॉटेल सील करण्यात आल्या आहेत. विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या साडेपाच हजार जणांवर कारवाई

पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी साडेपाच हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून प्रशासनाला सुमारे 56 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यापैकी मास्क न घातल्यामुळे 3669 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्यामुळे 1669 नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस प्रशासनाकडून 5 हॉटेल सील

कोरोना निर्बंधाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पोलीस कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने पंढरपूर शहर व तालुक्यातील सहारा परमिट, रूम दोस्ती ढाबा, मेजर कॉर्नर व गावरान तडका या हॉटेलमध्ये अचानक भेट दिली. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. स्क्रीनिंग मशीन व सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे आढळले. हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. यामुळे या हॉटेल सील करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.