ETV Bharat / state

भाजपने सांगितल्यास माढ्यातून लढण्यास तयार - विजयसिंह मोहिते-पाटील

author img

By

Published : Mar 28, 2019, 8:11 AM IST

विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून माढा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडून सांगितले गेले असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील

सोलापूर - भाजपने माढामधून लढा असे सांगितले तर आपण माढातून लढायला तयार असल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले असले तरी विजयसिंह मोहिते पाटील हे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहेत. मात्र, भाजपकडून माढामध्ये निवडणूक लढण्यास तयार असल्याचे खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी माढा दौऱ्यावर आले असता, त्यांनी सूचक विधान केले. माढा लोकसभा मतदार संघातून भाजप पक्षाचा उमेदवार जाहिर झाला नसल्याने माढाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजयसिंह मोहिते पाटील यांचा माढा दौरा

बुधवारी २७ मार्च रोजी विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पक्षाने संधी दिल्यास मी उभारणार असल्याची प्रतिक्रिया दिली. मोहिते-पाटील यांनी यांनी माजी आमदार धनाजी साठे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद कानडे, गुरुराज कानडे यांची देखील भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, स्वाभिमानी आघाडीचे शिवाजी कांबळे, प्रहारचे अतुल खुपसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक उपस्थित होते. दारफळ सिना येथील महादेव उबाळे या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी जाऊन मोहिते पाटील यानी सात्वंन केले.

Intro:R_MH_SOL_05_27_VIJAYSINH_READY_FROM_BJP_S_PAWAR

भाजपने सांगितल्यास माढा मधुन लढण्यास तयार - विजय सिंह मोहिते पाटील यांचे स्पष्टीकरण

सोलापूर-
भाजपने माढा मधून लढा असे सांगितले तर आपण माढा तून लढायला तयार असल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले आहे . रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले असले तरी विजयसिंह मोहिते पाटील हे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहेत. असे असले तरी भापज कडून माढा मध्ये निवडणूक लढण्यास तयार असल्याचे खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज माढा दौऱ्यावर आले असता सांगितले...Body:माढा लोकसभा मतदार संघातुन भाजपा पक्षाचा उमेदवार जाहिर झाला नसल्याने माढा च्या उमेदवारी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज बुधवार दि 27 मार्च रोजी विजयसिंह मोहिते पाटील हे माढा दौर्यावर आले होते . यावेळी बोलताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाने संधी दिल्यास मी उभारणार असल्याची प्रतिक्रिया दिली. माजी आ.धनाजी साठे यांची मित्रप्रेम निवास स्थानी जाऊन भेट घेतली.माजी जि.प.सदस्य आनंद कानडे,गुरुराज कानडे,याची देखील भेट घेतली.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे
स्वाभिमानी आघाडीचे शिवाजी कांबळे,प्रहारचे अतुल खुपसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे,यांचे सह विजयसिंह मोहिते पाटील याचे समर्थक उपस्थित होते. दारफळ सिना येथील महादेव उबाळे या शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती.त्यांच्या घरी जाऊन मोहिते पाटील यानी सात्वंन केले.
विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून माढा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपा कडून सांगितले गेले असल्याचे समजते.
भाजपने माढ्यासाठीचा आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.Conclusion:नोट- विजय सिंह मोहिते पाटील यांचा बाईट हा माढा मधील स्थानिक पत्रकाराने घेतलेला आहे... अंगेंस्ट लाईट आहे... हा बाईट वापरता येण्या सारखा नाही . माहिती साठी पाठविलेला आहे.... सोबत व्हिडीओ पण जोडला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.