करमाळा/सोलापूर - कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून भारतातही या संकटामुळे लॉकडाऊन केले आहे. संचारबंदीच्या काळात रोजंदारीवर उपासमारीची वेळ आली असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
करमाळा तालुक्यातील देवळाली येथे 300 कुटुंब असलेली वैदू समाजाची वस्ती आहे. वैदू समाज हा भटकंती करून व्यवसाय करून जगणारी जमात आहे. पत्र्याचे डबे बनविणे, स्टो, गॅस दुरुस्त करणे, सुया, फणी, कानातील झुमके इत्यादी वस्तु विकून ते आपली उपजीविका करतात. पण, लॉकडाऊनमुळे त्यांना व्यवसायासाठी बाहेर फिरता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या कुटूंबाना मदत मिळावी, अशी मागणी या देवळाली वैदू समाज बांधवांनी केली आहे.
हेही वाचा - कोरोनाशी लढा; संसर्ग रोखण्यासाठी करमाळ्यात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू