ETV Bharat / state

आषाढी यात्रेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण - Pandharpur police cover

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे यात्रा कालावधीत गर्दी होऊ नये म्हणून 17 ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पंढरपुरात भाविक येऊ नयेत म्हणून जिल्हा, तालुका व शहर असा तीनस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आषाढी यात्रेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण

author img

By

Published : Jun 25, 2021, 7:36 AM IST

पंढरपूर (सोलापूर)- आषाढी यात्राकाळात बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. आषाढी यात्रेसाठी 2700 पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यात आले असून यात्रा कालावधीत बंदोबस्तात असलेले पोलीस यांना संरक्षक किट देण्यात येणार आहे. पंढरीत भाविक येऊ नयेत म्हणून तीनस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना दिली.

आषाढी यात्रेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पोलीस प्रशासनाकडून तीनस्तरीय बंदोबस्त
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे यात्रा कालावधीत गर्दी होऊ नये म्हणून 17 ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पंढरपुरात भाविक येऊ नयेत म्हणून जिल्हा, तालुका व शहर असा तीनस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यात्रा काळात बंदोबस्तासाठी 2700 पोलीस अधिकारी व कर्मचारी
पंढरपूर येथील आषाढी वारी यात्रा बंदोबस्तात असलेले पोलीस यांना मास्क, सॅनिटायझर, पेस्ट, ब्रश, एनर्जी ड्रिंक, रेनकोट असलेले किट देण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिकारी गस्त घालणार आहेत. बंदोबस्तासाठी 2700 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे झेंडे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो.नि.अरुण पवार, पो.नि. किरण अवचर, पो.नि. प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते.

हेही वाचा- गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन, महापौरांचा फुगडीवर फेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.