पंढरपूर (सोलापूर) - चिल्लर पैसे देतो देण्याच्या बहाण्याने चंद्रभागा जवळील दगडी पूल परिसरात खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 65 एकर परिसरात एक अल्पवयीन मुलगा व दोन अल्पवयीन मुली खेळत होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांना पैशाचे आमिष दाखवून पुढे नेले. काही अंतरावर असलेल्या शौचालयात त्यातील मुलाला कोंडून मुलींना घेऊन पळ काढू लागला. त्यावेळी त्या मुलींनी आरओरडा केला. त्यावेळी आसपासते नागरिक येतील या भीतीने त्याने त्या मुलींनाही शौचालयात कोंडले. त्यानंतर तेथून पसार झाला. चिमुकल्यांचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी त्यांची सुटका केली.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध
या घटनेची माहिती मिळतात मुलींच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही मुलींना घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. संशयित आरोपी हा दोन दिवसांपासून चंद्रभागा नदी पात्राच्या परिसरात फिरत असल्याची माहिती एका व्यक्तीने दिली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - वास्तुशांतीच्या कार्यक्रमातून लाखोंचे दागिने लंपास, मुद्देमालासह बागायतदार ताब्यात