सोलापूर Umesh Patil on MP Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी दिवसभर पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या. अजित पवार गटाचे नेते व प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सोलापूर शहरात माध्यमांशी संवाद साधत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय. खासदार सुप्रिया सुळेंचा हिंदी आणि इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यात हेलपाटे मारू नये. हिंदी, इंग्रजी भाषेचा आधार घेत देशभरात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असा राजकीय सल्ला त्यांनी सुळेंना दिलाय. सुप्रिया सुळे या वर्षातील 180 दिवस दिल्लीत असतात. त्यांना दिल्ली महानगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आणता आला नाही. महाराष्टात हेलपाटे मारण्यापेक्षा देशभर पक्षाचा प्रचार केला असता तर, देशभरात राष्ट्रवादी खूप मोठा झाला असता अशी टीका उमेश पाटलांनी शरद पवार गटातील नेत्यांवर केलीय. (Supriya Sule Political advice)
पक्ष वाढविण्याची जबाबदारी : सुप्रिया सुळे या खासदार आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा होता. इतका मोठा पाठिंबा असतांना सुप्रिया सुळे देशभरात पक्ष वाढवू शकल्या नाहीत. याची जबाबदारी झटकून चालणार नाही, असे ते म्हणाले आहेत. गोवा, मिझोराम, नागालँड, बिहार, उत्तर प्रदेशात अजित पवारांनी पक्ष वाढवायला पाहिजे होता का? असा सवाल त्यांनी केलाय. अजित पवार महाराष्ट्र सांभाळायला एकटे सक्षम होते. परुंतु, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र राज्यात घुटमळत राहायचं होतं. म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालीय, अशी टीका अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी केलीय. (Umesh Patil criticized Supriya Sule)
सुळेंच्या कर्तृत्वावर उमेश पाटलांचे सवाल : आम आदमी पार्टी काही वर्षांपूर्वी स्थापन झालीय. आप सारख्या नव्या पक्षानं दोन राज्यात सत्ता स्थापन केलीय. पण, राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्र राज्यात एकहाती सत्ता घेता आली नाही. याला जबाबदार राष्ट्रवादीमधील सर्वच नेते आहेत. सुप्रिया सुळे तर दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्ली महानगरपालिकेत साधा नगरसेवक देखील निवडून आणला नाही. संपूर्ण देशभरात पक्ष वाढवण्याची क्षमता होती, तरीही पक्ष वाढवला नाही. खासदार सुळेंकडे कर्तृत्व असताना त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी वाढवण्यासाठी वेळ दिला नाही. (Ajit Pawar Group Leader)
पक्ष वाढवण्यासाठी वाटण्या : राष्ट्रवादी पक्षात संभ्रम निर्माण करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये लुडबुड केलीय. शरद पवार यांसारखा राष्ट्रीय व खंबीर नेतृत्व घरात असताना, पक्ष वाढला नाही. पवार फॅमिलीत पक्ष वाढवण्यासाठी वाटण्या झाल्या असत्या तर अजित पवारांना सत्तेत जाण्याची किंवा भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची वेळच आली नसती. यांना फक्त पायात पाय घालायचा होता, म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत फूट फाडली अशी टीका उमेश पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंचं नाव न घेता केलीय.
हेही वाचा :
Patil: पोरांना लग्नाआधी पोरं झाली! दोन पाटलांची खडाजंगी; पाहा व्हिडिओ
Sunil Tatkare On Sharad Pawar : शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य - सुनील तटकरे