ETV Bharat / state

उजनी बचाओ समितीचे सोलापूर-सातारा महामार्गावर आंदोलन - उजनी बचावो समितीबद्दल बातमी

उजनी बचाओ समितीकडून सोलापूर-सातारा महामार्गावर टायर पेटवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Ujani Bachao Samiti protested the state government by burning tires on Solapur Satara Road
उजनी बचावो समितीकडून सोलापूर सातारा रोडवर टायर पेटवून राज्य सरकारचा निषेध
author img

By

Published : May 24, 2021, 4:47 PM IST

पंढरपूर - उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा अध्यादेश लवकर काढावा या मागण्यासाठी उजनी धरण पाणी बचाओ संघर्ष समितीकडून पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे सोलापूर-सातारा महामार्गावर टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील, भाजप राज्य शेतकरी मोर्चा सचिव माऊली हळणवर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी उजनीचे पाणी सोलापूरच्या हक्काचे, अशा घोषणा देत राज्य सरकारचा जोरदार निषेध केला.

उजनी बचावो समितीकडून सोलापूर सातारा रोडवर टायर पेटवून राज्य सरकारचा निषेध

उजनी बचाओ संघर्ष समितीकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी -

जलसंधारण मंत्री जयंत पाटलांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याची घोषणा पाच दिवसांपूर्वी केली. मात्र, अद्यापही राज्य सरकारकडून त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे उजनी धरण पाणी बचओ संघर्ष समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहीनिशी लवकरात लवकर हा आदेश काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांकडून रविवारी पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील उपरी गावातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

उपरी गावात सोलापूर-सातारा रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा आदेश रद्द करावा. त्यासंदर्भात अध्यादेश लवकर काढावा, या मागणीसाठी उजनी धरण पाणी बचाओ संघर्ष समितीच्या सदस्यांकडून उपरी गावात सोलापूर-सातारा रोडवर टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.